महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी करत आहेत भष्ट्राचार
By Admin
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी करत आहेत भष्ट्राचार
श्रीगोंदा शहरामधील वेळू रोड वरील बोरुडे डी पी वर अति विद्युतभार निर्माण करून स्थानीय शेतकऱ्यांचे नुकसान
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 24 एप्रिल 2021
सविस्तर असे की,शेतकऱ्यांनी चौगुले साहेब(उपअभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी श्रीगोंदा)यांना निवेदन दिले आहे, त्या निवेदनात म्हटले आहे. की आम्ही 20ते25 शेतकरी शेती व्यवसाय करतो.आम्ही शेती कृषी पंप करिता मौजे श्रीगोंदा वेळू रोड वरील बोरुडे डी.पी वरुन कायदेशीररित्या कोटेशन भरून कनेक्शन घेतलेले आहे आम्ही सर्व कनेक्शन धारक हे जुने ग्राहक आहोत त्याच वेळी सदरच्या डी.पी वरील विद्युतभार संपलेला आहे परंतु सदर डी.पी वर विद्युत भार शिल्लक नसताना अनेक ग्रामीण कनेक्शन धारकांना संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदाराला हाताशी धरून बेकायदेशीर शहरी डी.पी वरील एल.टी.लाईन ओढून सदरच्या डी पी वर प्रमाणापेक्षा जास्त अधिभार निर्माण केलेला आहे. त्यामुळे सदर डी.पी नादुरुस्त झालेली आहे,होत आहे.तसेच सदरच्या डी.पी वर जास्त अधिभार झाल्यामुळे ऑईल बाहेर येत आहे तसेच सदरच्या डी.पी वरील फेज जळत आहे. त्यामुळे अधिकृत कनेक्शन धारकांचे हाल होताना दिसत आहेत.त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांचे नुकसान देखील होत आहे.त्यामुळे सदरच्या डी.पी वरील बेकायदेशीर एल.टी.लाईन ताबड़तोड़ तोड़ने आवश्यक आहे,तसेच येथून पुढे सदर डी.पी.वर अधिभार शिल्लक नसताना कोणत्याच लाभ धारक शेतकऱ्यास नवीन विद्युत कनेक्शन देऊ नये. तसे केल्यास कायदेशीर कनेक्शन लाभधारकांचे अतोनात असे नुकसान होईल उप अभियंता साहेबांना मौजे श्रीगोंदा, शहरामधील,वेळू रोड,बोरूडे डी. पी.वरील बेकायदेशीर (एल.टी.लाईन)ओढलेली लाईन ताबडतोब तोडण्यात किंवा कट करण्यात यावी. तसेच डी पी वर नवीन शेतकऱ्यास कनेक्शन देऊ नये असे वागण्यास आपण कसूर केल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबवा लागेल अशी विनंती शेतकऱ्यांनी उप अभियंता कडे केली होती.त्यानंतर उप अभियंता यांनी शेतकऱ्यां आरे वारीची भाषा केली.
#आमच्या प्रतिनिधिनी उप अभियंता चौगुले यांच्या कडे दूरध्वोनी वरुन संपर्क साधला असता त्यांनी सांगितले हा सदर प्रकार काय चालू आहे,मला माहित नाही हा भाग आमच्या कडे येत नाही. तुम्हाला माझी काय चौकशी करायची ती करा मि कोणालाही भेत नाही. आणि त्यानंतर कॉल कट केला. अशी रेकॉर्ड किल्प प्रतिनिधि यांच्या कडे उपलब्ध आहे.
पुन्हा आमचे प्रतिनिधि त्यांच्याकडे गेले असता त्यांनी मुलाखत देण्यास टालळी.
#त्यानंतर उप अभियंता यांच्या कर्मचाऱ्यांना(वायरमन) कॉल केला असता, त्यांनी सांगितले साहेबांना आर्थिक दिल्यास सर्व काही बरोबर होते. मलाही साहेबच सांगतात कोणाची लाईट जोडायची कोणाची नाही. हे सर्व काम उप अभियंता चौगुले साहेब सांगतात. श्रीगोंदा नगरपालिका हद्द ही चौगुले साहेबांच्याच हद्धित येते असे ही त्या कर्मचाऱ्यांनी सांगितले.अशी रेकॉर्ड किल्प प्रतिनिधि यांच्या कडे उपलब्ध आहे
#सदर शेतकरी हे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, उर्जा मंत्री,यांना ऑनलाइन पत्र पाठवून. राज्यमंत्री बच्चु कडू,अहमदनगरचे पालकमंत्री,जिल्हाधिकारी, जिल्हा अभियंता(म.रा.वि.कं अहमदनगर) यांची प्रत्यक्ष भेट घेऊन उप अभियंता श्रीगोंदा यांच्या चौकशीची मागणी करणार आहे.