महाराष्ट्र
37962
10
कवडदरा विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न
By Admin
कवडदरा विद्यालयात आनंद मेळावा उत्साहात संपन्न
कवडदरा - इगतपुरी तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशीच (दि.१ जानेवारी २०२६ ) गुरुवार रोजी आनंद मेळावा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
आनंद मेळाव्याचे उद्घाटन भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाश जाधव साहेब ,इगतपुरी तालुका भाजपचे तालुकाध्यक्ष हनुमंता निसरड,ज्येष्ठ नागरिक कोडांजी बाबा भोईर,सपंत भाऊ रोंगटे,भाऊराव रोंगटे,दत्तू पाटील जुंदरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक/प्राचार्य बी.एस.पवार,
भाऊसाहेब खातळे,कैलास फोकणे,
संतोष रोंगटे,गणेश रोंगटे,उत्तम भाऊ बिन्नोर,दत्तुभाऊ तुवर,
माजी विद्यार्थी,पालक,विद्यार्थी,शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य मंडळ तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थित उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आनंद मेळाव्यात सहभागी होत विविध वस्तूचे स्टाॕल दुकाने विद्यालयाच्या मैदानात लावली होती.यामध्ये भाजीपाला बाजार,खाद्य वस्तू, पाव भाजी,वडापाव,सॕडवीच,थंडाई,मठ्ठा,चहा
मुलांचे विविध खेळ असे अनेक दुकाने लावली होती.आनंद मेळाव्याला याञेचे स्वरुप आले होते.
यावेळी विद्यार्थी,शिक्षक,पालक यांनी आनंद मेळाव्याचा आनंद घेत विविध स्वादिष्ठ खाद्य वस्तूचा आनंद घेतला.या आनंद मेळाव्यासाठी मुख्याध्यापक बी.एस.पवार,आर.एल.राठोड,जी.जे.जाधव,एन.एस.पवार,एस.एस.लोहार,पञकार अमोल म्हस्के,डी.व्ही.चव्हाण,पी.ई.परदेशी,
डी.आर.चव्हाण,व्हि.आर.भांगे,एस.डी.जाधव,गजघाट सर,डी.आर.गोडसे, शरद झनकर,सी.एम.जाधव,एन.एस.जाधव,
तांबे सर,भोगीर सर, तसेच महिला शिक्षिका सौ. के.ए.मुल्ला मॕडम,एस.के.भोईर मॕडम,पावडे मॕडम,
वाकचौरे मॕडम,तुपे मॕडम,भालेराव मॕडम,मुंडे मॕडम, शिक्षकेतर कर्मचारी वरीष्ठ लिपिक कदम सर, किरण कासार,खेडकर मामा तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर, स्वयंसेवक विद्यार्थी,पालक यांचे विशेष सहकार्य मिळाले.
Tags :
37962
10




