श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर श्रीराम नवमी उत्साहात साजरी
By Admin
श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर श्रीराम नवमी उत्साहात साजरी
पाथर्डी प्रतिनिधी:
श्रीक्षेत्र मोहटादेवी गड येथे श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.
वासंतीक नवरात्र महोत्सव अंतर्गत श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे चैत्र शु. श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीराम नवमी निमीत्त श्रीक्षेत्र मोहटादेवीगडावर सकाळपासुन भावीकांची मोठी गर्दी होती. श्रीराम जन्माचा सोहळा विधीवत पुजन तहसिलदार तथा विश्वस्त डॉ. श्री. उध्दव नाईक, श्री शशिकांत दहिफळे, श्री बाबासाहेब दहिफळे, श्री अशोक दहिफळे, श्री बाळासाहेब लाहोटी, श्री शुभम दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आले. विधीवत पुजन झाल्यानंतर फुलांच्या वर्षावाने तसेच जय श्रीराम, जय मोहटादेवी च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
श्रीराम जन्मानंतर पारंपारिक पध्दतीने प्रभू रामाचा पाळण्याचे गायन करण्यात आले. आरतीनंतर भावीकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. श्रीराम जन्मोत्सवाचे विधीवत पुजन देवस्थानचे पुजारी वे भूषण साकरे, भास्कर देशपांडे यांनी केले. पाथर्डी येथील कु. गोला राधा आनंद, कु. गोला सस्कृती आनंद यांनी रांगोळीच्या सह्याने श्रीरामाची प्रतिमा साकारली. त्यानिमीत्ताने देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदीप घुले , कर्मचारी, ग्रामस्थ व भावीक भक्त मोठ्या संख्यने उपस्थित होते. श्रीराम नवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
वासंतीक नवरात्र महोत्सव अंतर्गत श्रीक्षेत्र मोहटादेवीगड येथे चैत्र शु. श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीराम नवमी निमीत्त श्रीक्षेत्र मोहटादेवीगडावर सकाळपासुन भावीकांची मोठी गर्दी होती. श्रीराम जन्माचा सोहळा विधीवत पुजन तहसिलदार तथा विश्वस्त डॉ. श्री. उध्दव नाईक, श्री शशिकांत दहिफळे, श्री बाबासाहेब दहिफळे, श्री अशोक दहिफळे, श्री बाळासाहेब लाहोटी, श्री शुभम दहिफळे यांच्या हस्ते करण्यात आले. विधीवत पुजन झाल्यानंतर फुलांच्या वर्षावाने तसेच जय श्रीराम, जय मोहटादेवी च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
श्रीराम जन्मानंतर पारंपारिक पध्दतीने प्रभू रामाचा पाळण्याचे गायन करण्यात आले. आरतीनंतर भावीकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले होते. श्रीराम जन्मोत्सवाचे विधीवत पुजन देवस्थानचे पुजारी वे भूषण साकरे, भास्कर देशपांडे यांनी केले. पाथर्डी येथील कु. गोला राधा आनंद, कु. गोला सस्कृती आनंद यांनी रांगोळीच्या सह्याने श्रीरामाची प्रतिमा साकारली. त्यानिमीत्ताने देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदीप घुले , कर्मचारी, ग्रामस्थ व भावीक भक्त मोठ्या संख्यने उपस्थित होते.
28143
10