मराठा आरक्षण न मिळण्यास सर्वच पक्ष जबाबदार - डाॕ. कृषिराज टकले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 11 मे 2021, मंगळवार
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करून सुद्धा लढ्याला अपयश आले आहे. मराठा समाजाची बाजू सरकारने भक्कमपणे मांडली असती तर मराठा आरक्षण रद्द झाले नसते. मागील युती सरकारने मराठा समाजाची सहानुभूती मिळण्यासाठी आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा समाजाला आरक्षण घोषित केले. परंतु आरक्षण कायद्यात बसेल किंवा नाही याचा अभ्यास करायला युती सरकार कमी पडले. युती सरकार असो किंवा महाविकासआघाडी सरकार मराठा समाजाचा वापर निवडणुकांपूरताच केला जातो त्यामुळे सर्व पक्ष मराठा आरक्षण न मिळण्यास जबाबदार आहे, असे मत
पाथर्डी तालुक्यातील हञाळ येथील स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले यांनी व्यक्त केले आहे.
मराठा आरक्षण गरीब, श्रमिक मराठ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या यासारखे गंभीर प्रश्न आरक्षणामुळे कमी होऊ शकतात. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारने आरक्षणात राजकारण न करता हा प्रश्न समन्वयाने सोडवावा.
सत्ताधारी मराठा आमदार, खासदार, मंत्री या प्रश्नावर संसदेत, विधानसभेत का बोलत नाही मग निवडणुका आल्यावरच त्यांना मराठा समाज आठवतो का ॽ असा सवालही स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषिराज टकले यांनी केला आहे.