रामराव चव्हाण व सुरेश चव्हाण यांचेकडून जिल्ह्यातील दोन कोवीड सेंटरला प्रत्येकी ११ हजारांची मदत
पाथर्डी प्रतिनिधी -
पाथर्डी तालुक्यातील घुमटवाडी येथील युवा नेते सुरेश चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस रामराव चव्हाण यांचेकडून सामाजिक बांधिलकी जपत अहमदनगर जिल्ह्यातील भाळवणी येथील आ. निलेश लंके प्रतिष्ठान चे शरद पवार कोवीड सेंटर व पाथर्डी शहरातील कै. सुमनताई ढाकणे सेंटरला प्रत्येकी ११ हजारांची मदत देण्यात आली आहे.
तसेच पाथर्डी तालुक्यातील ऊसतोड कामगारांच्या ९० कुटुंबांना किराणामालाचे वाटप करण्यात आले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे एक अभूतपूर्व परिस्थितीला संपूर्ण जग सामोरे जात आहे. अशा परिस्थितीत जगण्याची पुरेशी संसाधने नसल्याने, रोजगार नसल्याने गरीब सामान्य कुटुंबातील लोकांना कोरोना वर मोफत उपचार व आहार मिळावा यासाठी युवा नेते सुरेश चव्हाण व रामराव चव्हाण हे नेहमीच अग्रेसर असतात. त्यांनी मदतीचा हात पुढे करत शरद पवार कोवीड सेंटर कै.सुमनताई ढाकणे कोवीड सेंटरला प्रत्येकी अकरा हजार रोख मदत निधी म्हणून सुपूर्त केली व गरीब आणि गरजू कुटुंबीयांना किराणा साहित्याचे वाटप केले.
यावेळी रामराव चव्हाण म्हणाले, आपण समाजाचे एक घटक आहोत. त्यामुळे सर्व स्तरातील समाज बांधवांनी फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत केली पाहिजे. आपण हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा हातात हात घालून काम करण्याची आज गरज आहे.
याप्रसंगी बंडू शेठ बोरुडे, सिताराम बोरुडे, सुरेश चव्हाण, योगेश रासने, सचिन चव्हाण, एम.पी.आव्हाड, शिवाजी बडे, सुनील राठोड, रोहिदास चव्हाण, अशोक चव्हाण, नितीन राठोड, संजय चव्हाण, गोरख चव्हाण आदींची उपस्थिती होती.