अहमदनगर जिल्ह्यातील आजच्या ठळक घडामोडी - बातमी पञ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी- 19 मे 2021,बुधवार
शिर्डी येथील साईबाबा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती यंत्रणा कार्यान्वित; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ऑनलाईन उपस्थितीत लाेकार्पण
अहमदनगर जिल्ह्यात काेराेना उपचारानंतर 3 हजार 156 रुग्णांना रुग्णालयातून घरी साेडलं; रुग्ण बरे हाेण्याचं प्रमाण सुमारे 90 टक्क्यांवर
काेराेनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातील बाजार समित्या 31 मे पर्यंत बंद; जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भाेसले यांचा आदेश
महापालिकेनं 15 लाख लसींचे डाेस खरेदी करावेत; आमदार संग्राम जगताप यांचं आयुक्त शंकर गाेरे यांना पत्र
चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील खंडीत झालेल्या 25 विद्युत उपकेंद्रांतून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत; महावितरणच्या अहमदनगर कार्यालयाची माहिती
मराठा आरक्षणासाठी आंदाेलनात भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी हाेणार; आमदार बबनराव पाचपुते यांची माहिती
हनी ट्रॅपमध्ये अधिकाऱ्याला ब्लॅकमेल; महिलेसह चार जणांविराेधात नगर तालुका पाेलिसांनी नाेंदविला गुन्हा, आराेपींमध्ये पाेलीस कर्मचाऱ्याच्या भावाचा समावेश
एमआयडीसीतील पाेलीस कर्मचारी अनिल आव्हाड यांना मारहाण करणाऱ्या दाेघांना अटक; न्यायालयानं दाेघांना सुनावली पाेलीस काेठडी
अकाेले पाेलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याला पाच हजार रुपयांची लाच घेताना अटक; चॅप्टर केसबराेबर जामिनासाठी मागितले पैसे
काेराेना उपचारादरम्यान काल 28 जणांचा मृत्यू; जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 516 जणांचा मृत्यू
आयुर्वेद काॅलेजमध्ये ऑक्सिजन सुविधा असलेला अतिदक्षता विभाग सुरू; जय आनंद फाऊंडेशन आणि मनपाचा पुढाकार