माणुसकीला काळीमा फासवणारी घटना दवाखान्याच्या बिलासाठी अडवला मृतदेह, पत्नीने गळ्यातील दागिने विकूनही जमली नाही रक्कम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - सोमवार 10 मे 2021
पाथर्डी तालुक्यातील शेतकरी कुटुंबावर ही वेळ आली होती.मृताच्या पत्नीला दवाखान्याचे पैसे भरण्यासाठी गावोगावी दारोदार फिरण्याची वेळ आली.खूपच वाईट घटना घडली.एकतर पती गेला आणि नंतर दवाखान्याच्या पैसे भरण्यासाठी सांगितले.
अहमदनगर शहरात एका हाॕस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकाकडून बिलाच्या नावावर अवाढव्य रक्कम घेतली जात आहे.हे अत्यंत चुकीचे आहे.
अहमदनगर शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांकडून बिलाच्या नावावर अवाढव्य रकमा वसूल केल्या जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. काल एका खासगी रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. दोन लाख आठ हजारांच्या बिलासाठी कोरोनाबाधिताचा मृतदेह हॉस्पिटलने अडवून धरला. हे बिल भरण्यासाठी मृताच्या पत्नीने मंगळसूत्र मोडले. तरीही रकमेची पूर्तता झाली नाही, त्यामुळे तिच्यावर पैशासाठी वणवण फिरण्याची वेळ आली.
शहरातील एका खासगी रुग्णालयात पाथर्डी तालुक्यातील शेतकरी असलेला एक कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारादरम्यान त्याची तब्येत खालावत गेली. त्यातच गुरुवारी (ता.
सायंकाळी त्याचा मृत्यू झाला. त्यांचे कुटुंबीय अंत्यसंस्कारासाठी नगरमध्ये दाखल झाले.
हॉस्पिटल प्रशासनाने, दोन लाख आठ हजार रुपये भरल्यानंतरच मृतदेह हॉस्पिटलबाहेर सोडू, असे सांगितले. जवळ तेवढे पैसे नसल्याने मृत कोरोनाबाधिताच्या पत्नीने, दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही गळ्यातील मंगळसूत्र व अन्य दागिने सोनाराकडे मोडण्यासाठी नातेवाइकांकडे दिले. पतीच राहिला नाही तर मंगळसूत्र ठेवून करू काय, असे म्हणत तिनी सर्व दागिने दिले. त्यातून एक लाख 70 हजार रुपये मिळाले. ते हॉस्पिटलमध्ये देण्यात आले. तरीही हॉस्पिटल प्रशासनाने उर्वरित 38 हजार रुपये भरल्याशिवाय मृतदेह देणार नसल्याचा पवित्रा घेतला. ही रक्कम जमवण्यासाठी मृताची पत्नी काल दिवसभर गावात व विविध नातेवाइकांकडे फिरत होती.
या अश्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना खाजगी रुग्णालयांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. या घटनेवर आता राज्य सरकार काही पाऊल उचलते का? ते पाहावे लागेल.