पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांना दिला 'हा' पुरस्कार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 14 मे 2021
कोरोनाच्या या कठीण काळामध्ये सध्या महाराष्ट्र भर चर्चेमध्ये असलेले आमदार निलेश लंके यांना कोरोना केसरी किताबाने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना हिंदकेसरी फाउंडेशन सुर्ली,कराड यांच्या वतीने देण्यात आला. यात अडीच किलो चांदीची गदा व कोरोना केसरी सन्मानपत्र व एक लाख रुपये चा धनादेश देऊन गौरविण्यात आले.
कोरोनाच्या जागतिक महामारीच्या काळामध्ये त्यांनी केलेले सेवाकार्य मानवतेच्या दृष्टीने एक अमूल्य उदाहरण आहे. लोकप्रतिनिधी आणि समाजसेवक याची योग्य सांगड घालत त्यांनी लोकसेवा सुरू ठेवली आहे. एक उत्तम लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्र त्यांच्याकडे आदराने पाहतोय. स्वतः मैदानात उतरून आपल्या लोकांसाठी कोरोनाशी दोन हात करत खऱ्या अर्थाने पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी कोरोना बरोबरची कुस्ती चितपट करण्याचे कार्य केलेले आहे.त्यामुळे लंके यांना हिंदकेसरी पै.संतोष वेताळ (आबा) यांच्या हस्ते अडीच किलो चांदीची गदा,एक लाख रुपयेचा धनादेश,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना कोरोना केसरी हा किताब देण्यात आला. यावेळी नवनाथ पाटील, सुर्ली गावचे सरपंच.
दत्तात्रय वेताळ, समाजसेवक निसार मुल्ला, सोनू मदने,माजी उपसरपंच कृष्णत मदने हे उपस्थित होते.