तिसरा बूस्टर डोस गरजेचा - सायरस
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
काेरोनाचे दोन डोस घेतल्यानंतरही सहा महिन्यानंतर व्यक्तीच्या शरीरातले अँटीबॉडीज कमी होतात. त्यामुळे दोन डोसनंतर तिसरा बूस्टर डोस गरजेचा आहे. काेरोनाचा प्रादुर्भाव कायम राहिल्यास कदाचित बूस्टर डोसनंतरही पुन्हा लस घ्यायला लागू शकते,' असे सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी म्हटले आहे. पूनावाला यांना आज लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी त्यांनी हे मत मांडले.