पाथर्डी तालुक्यातील वसुजळगाव येथे विविध विकास कामाचे भूमीपुजन
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील वसुजळगाव येथे पुरहानी योजने अंतर्गत वसुजळगाव ते गैबी रस्ता 25.00 लक्ष रुपये कामाचे व 2515 अंतर्गत मारुती मंदिरासमोर सभामंडप बांधणे 10.00 लक्ष रुपये या कामाचे भूमिपूजन शेवगाव पाथर्डीच्या लोकप्रिय आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमास सभापती सौ सुनिताताई दौड जिल्हा परिषद सदस्य राहुल दादा राजळे, भाजप तालुका महिला आघाडी अध्यक्ष काशिताई गोलहार, सोमनाथ भाऊ खेडकर, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत अकोलकर, गटनेते सुनील ओहळ, सुभाष केकान, भगवानराव साठे, कार्यक्रमाचे अध्यक्ष विठ्ठल चौधर साहेब , नगराध्यक्ष डॉ मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, बाबासाहेब किलबिले, बाळासाहेब गोल्हार, खरेदी विक्री संघाचे संचालक संदीप पठाडे, अजय रक्ताटे, सरपंच अंजलीताई गर्जे, सर्जेराव पठाडे मामा, अजिनाथ धायताडक, संदीप गर्जे, अभिजित गर्जे, गंगा सुपेकरसर, विनोद थोरात सर, अनंत राजळे आदी ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते.