महाराष्ट्र
3275
10
पाथर्डी- कृषीदुत शेतकऱ्यांसाठी ठरतोय वरदान!
By Admin
पाथर्डी- कृषीदुत शेतकऱ्यांसाठी ठरतोय वरदान!
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील कासळवाडी येथे आधुनिक शेती विषयी कृषीदुत कासुळे प्रशांत विजय या शेतकऱ्याने स्वतः विविध प्रकारचे प्रात्यक्षिके घेऊन आधुनिक शेती तंत्रज्ञानविषयक माहिती पुरवत आहेत.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ सलग्न एच. एच. श्री मुरलीधर स्वामीजी कृषी महाविद्यालय मालेगांव महाविद्यालयाचे कृषीदुत कासूळे प्रशांत विजय हे सध्या उद्भवलेल्या कोविड च्या परिस्थितीमुळे विद्यार्थी हे त्यांच्या जवळीलगावांमध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.
ग्रामीण (कृषी) उद्योजकताजागृती विकास योजना आणि कृषी औद्योगिक कार्यक्रम २०२१-२२ या कार्यक्रमा अंतर्गत त्यांनी त्यांच्या जवळील गावांमध्ये जाऊन शेतकऱ्यांना वैज्ञानिक पद्धतीने पीक साठवणूक करणे, जेणे करून पिक काढल्यानंतर त्याचा दर्जा कमी होऊ नये, तसेच पिकामधील सुक्ष्म अन्नद्रव्यांचे महत्व व सुक्ष्म अन्नद्रव्ये न भेटल्या मुळे होणारे परिणाम, बीजप्रक्रिया व त्याचे महत्त्व , सेंद्रिय पद्धतीने खत तयार करणे, आधुनिक मोबाईल ॲप द्वारे हवामानाचा अंदाज घेणे, विविध ॲप द्वारे रोग ओळखणे व त्यावरील उपाययोजना या सह अनेक प्रात्यक्षिके सादर करून शेतकऱ्यांना आधुनिक शेती विषयी संपूर्ण मार्गदर्शन करत आहेत. या सर्व कार्यक्रमामध्ये कृषीदुत कासुळे प्रशांत यांना कृषी महाविद्यालय मालेगाव जि: नाशिक चे प्राचार्य डॉ. पी. ए. तूरबटमठ, उपप्राचार्य डॉ.एस.ए राऊत, डॉ. पी.के. सूर्यवंशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक एस. व्ही. अहिरे व विषय प्राध्यापक डॉ.जी.इस.बनसोडे, प्रोफेसर के.ई.शेवाळे, प्रोफेसर एस. व्ही.बागल, प्रोफेसर एस. एस. बोरसे यांचे मार्गदर्शन भेटत आहे.
" पारंपरिक शेतीमध्ये खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान व सेंद्रिय शेती यामुळे उत्पन्न वाढून खर्च कमी होऊ शकतो व यामुळे नवीन तरुण वर्गा मध्ये शेती कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो. कृषीदुत कासुळे प्रशांत याने दिलेली महिती खरंच शेतकऱ्यांच्या खूप उपयोगी आहे. माझ्या सह सर्व शेतकऱ्यांकडून त्याचे कौतुक होत आहे."---मच्छिंद्र कासुळे (प्रगतशील शेतकरी, कासळवाडी)
Tags :

