माळी बाभुळगाव येथील अवैद्य गावठी दारु बंद होणे बाबत पाथर्डी पोलिस स्टेशन येथे ग्रामस्थांचे निवेदन
दारू बंद नाही झाल्यास गावातील सर्व तरुण रस्त्यावर उपोषण करणार
पाथर्डी-
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माळी बाभुळगाव येथील अवैद्य गावठी दारू बंद होणे बाबत माननीय तहसीलदार साहेब, माननीय पोलीस निरीक्षक चव्हाण साहेब, यांना माळी बाभुळगाव ग्रामस्थ व तरुणांच्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की. माळीबाभुळगाव गावठाण हद्दी मध्ये हरिजन वस्ती येथे गावठी दारू विक्री चालू आहे. त्या शेजारी अनेक कुटुंब राहतात. त्याचप्रमाणे शेजारी मुस्लिम समाजाची मज्जित आहे. तसेच प्रांत कार्यालय ते हातराळ ते पाडळी रस्ता आहे. या रस्त्यावर कायम रहिवासी यांची वर्दल असते . व गाव गावातील विद्यार्थी-विद्यार्थिनी शाळेसाठी पाथर्डी येथे जात असताना त्या ठिकाणी खूप नशापाणी करून दारुडे उभे असतात.त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना त्याचा खूप त्रास सहन करावा लागतो. त्या ठिकाणी दारुडे लोकांना त्रास देत असून तेथिल रहिवासी यांना समज दिली असता. सदरील मद्यपी नशा करून तेथील रहिवासी यांना शिवीगाळ करणे रस्त्यावर घरा कडे तोंड करून लघवी करणे, शेजारील रहिवासी महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे. अशा अनेक प्रकारचा त्रास चालू आहे. व काही बोलल्यास दम देऊन आडदांड शाईने वागतात. येथील राहणारे रहिवासी यांनी वेळोवेळी दारू बंद करणे याबाबत मागणी केली आहे. तरी दारू बंदी झालेली नाही. अवैद्य दारू लवकरात लवकर बंद व्हावी यासाठी आम्ही सर्व तरुण मागणी करत आहोत.असे निवेदन माननीय पोलीस निरीक्षक साहेब व तहसिलदार साहेब यांना दिले आहे.
सदरील दारू बंद नाही झाल्यास गावातील सर्व तरुण रस्त्यावर उतरून उपोषण करणार असा इशारा यावेळी सर्व तरुणांचे वतीने देण्यात आला.
यावेळी
.ग्रामपंचात सदस्य गणेश वायकर,मा. आर.बी.शेख , भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन वायकर,मा सरपंच रशिद शेख, ग्रामपंचायत सदस्य सचिन कोलते, ग्रामस्थ, शौकत भाई शेख , तोहीद शेख,तोफिक शेख अलीम शेख ,मोसिम शेख,शरद कुटे, निसार शेख, भास्कर तांबे ,झमिर शेख व गावातील ग्रामस्थ व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.