निऱ्हाळी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी जपली सामाजिक बांधिलकी
पाथर्डी - प्रतिनिधी
पाथर्डी शहरातील एम. एम. निऱ्हाळी विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तालुक्यातील विविध कोविड सेंटरला पाण्याचे बॉक्स, औषध- गोळ्या, सॅनिटायझर, व खजुराची मदत केली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू असून गरजू आणि गोरगरिबांसाठी तसेच तालुक्यातील कोविड केअर सेंटरला मदत करण्याच्या हेतूने एम. एम. निऱ्हाळी विद्यालय पाथर्डी येथील २००७ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकी जपत विविध कोविड सेंटरला पाण्याचे बॉक्स, गोळ्या-औषधे, सॅनिटायझर खजूर तसेच गरजू आणि गोरगरिबांसाठी किराणा साहित्य इत्यादी आपल्यापरीने मदतीचा हात पुढे केला आहे.
कै. सुमनताई कोविड सेंटरला या माजी विद्यार्थ्यांनी रुग्णासाठी लागणारे गोळ्या-औषधे, सॅनीटायझर, दहा पाण्याचे बॉक्स, २० किलो खजुराची मदत केली. अतिथी मंगल कार्यालयात उभारलेल्या गोपीनाथ मुंडे कोविड सेंटरला पाण्याचे बॉक्स व अन्नदान करण्यात आले. माणिकदौंडी येथील पंचक्रोशी कोविड सेंटरला ४० पाण्याचे बॉक्स व सॅनिटायझर ची भेट देण्यात आली. तसेच वाळुंज येथील स्व. गोपीनाथ मुंडे साहेब कोविड सेंटरला ५० पाण्याचे बॉक्स, काळे खजुराची मदत केली. तसेच शहरांमधील ४० गरजू व गोरगरिबांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.
एम.एम. निऱ्हाळी विद्यालयाचे माजी विद्यार्थ्यांनी कोरोनाच्या या कठीण प्रसंगी गरजू लोकांना तसेच कोविड सेंटरला मदत करण्याचे सामाजिक भान राखून शाहिद बागवान, महेश दौंड, गणेश वाखुरे, निलेश चव्हाण व नोकरी निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या मित्रपरिवाराने एकत्र येऊन तालुक्यातील कोविड सेंटरला तसेच गोरगरीब, गरजूंना किराणा साहित्याच्या मदत केली आहे.