महाराष्ट्र
4997
10
सोनाराचा झाला खुन अखेर तपासात झाले निष्पन्न, भातकुडगाव शिवारात मृत्यदेह आढळला
By Admin
सोनाराचा झाला खुन अखेर तपासात झाले निष्पन्न, भातकुडगाव शिवारात मृत्यदेह आढळला
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 23 मे 2021,रविवार
बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथील एका सोनाराचा गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून खुन करण्यात आला. मृत्यूदेह शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथे एका शेतात पुरण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत शिरूर कासार चे पोलीस निरिक्षक सिध्दार्थ माने यांनी बोलताना म्हणाले की, शिरुर कासार येथील सोनार विशाल सुभाष कुलथे ( वय - २५ ) या इसमाचा गुन्हा रजि. ६३ / २०२१ कलम ३६५ भादवि ३४ नुसार गुन्हा दाखल आहे. 153
सदर घटना गुरुवार दि. २० रोजी घडली. गुप्त खब-यामार्फत माहिती मिळाल्यानंतर चौकशी केली असता शेवगाव तालुक्यातील भातकुडगांव येथील ज्ञानेश्वर गायकवाड याचे शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असून याच दुकानात सोनाराचा खुन करण्यात आला आहे. अधिक माहिती घेवुन त्याचा साथीदार केतन लोमटे याला ताब्यात घेतले. लोमटे यांनी अगोदर उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्याला पोलीस खाक्या दाखवताच तो पोपटासालखा बोलु लागला व गुन्ह्याची कबूली देत ज्या ठिकाणी मृत्यूदेह पुरण्यात आला ते ठिकाण दाखविण्यात आले.
शेवगांव तालुक्यातील भातकुडगांव येथील गट नंबर ४२९/१/१ मधील दत्तात्रय हरिभाऊ गायकवाड यांच्या शेतात मृत्यूदेह लांबी चार बाय रुंदी तीन व खोली फुटाचा खड्डा खोदून पुरून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड याचा शिरूर कासार येथे सलूनचे दुकान असल्याने त्याने सोने खरेदी चा बहाना करून सोनार विशाल सुभाष कुलथे यांच्या शी संपर्क केला. माझे लाॅकडाऊनमध्ये लग्न झाले. त्यामुळे जास्त सोन करायचे आहे असे सांगून आॅर्डर देण्यात आली. दुकानातील तयार असलेले सोने घेवून माझ्या दुकानात ये असे गायकवाड म्हणाला.
सोनार सोने घेवून सलुन दुकानात गेला व त्याच ठिकाणी त्याचा घात झाला. शेवगाव पोलीस, शिरूर पोलीस, महसूल शेवगाव यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा करण्यात आला. पोष्टमार्टमसाठी मृत्यूदेह पाठविण्यात आला. केतन लोमटे, शिवाजी गायकवाड यांना अटक करण्यात आली असून ज्ञानेश्वर गायकवाड फरार असल्याचे तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक सिध्दार्थ माने यांनी सांगितले. जनपुढील तपास चालू आहे. शिरूर कासार येथील विशाल सुभाष कुलथे यांचे सहा महिन्यापूर्वीच लग्न झाले होते.
Tags :

