लसीचा तुटवडा केंद्र सरकार जबाबदार - सिरम
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 22 मे,शनिवार
कोरोना लसीकरणाच्या तुटवड्यावरून सीरम इन्स्टिट्यूटने पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे. लसींच्या कमतरतेला सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया या लस निर्मिती कंपनीने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. केंद्र सरकारने लशींच्या साठ्याबाबत कोणतीही माहिती न घेता १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणाला परवानगी दिली. इतकेच नाही तर, जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) गाइडलाइन्सवर देखील केंद्र सरकारने विचार केला नाही, सीरम कंपनीचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटले आहे.
वस्तूच्या उपलब्धता पाहूनच त्याच्या वापराबाबत आपण योग्य तो निर्णय घ्यायची गरज असते. लसीकरण गरजेचेच आहे, मात्र लसीकरण केल्यानंतरही अनेक जणांना कोरोनाची लागण होत आहे. कोरोना होऊ नये यासाठी लोकांनी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन नागरिकांनी केले पाहिजे, असे जाधव म्हणाले.