कोटीची केली खंडणी,आरोपी महीलेसह साथीदारास अटक
By Admin
कोटीची केली खंडणी, महीला आरोपीसह साथीदारास अटक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 15 मे 2021, शनिवार
ब्लॅकमेलिंग करून लाखो रुपये उकळणा-या महिलेसह एकास मोठ्या चाणक्षाने जेरबंद करण्यात नगर तालुका पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी तपासात मोठे 'हानीट्रॅपचे रॅकेट' उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती अपर जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी पञकारांशी बोलताना सांगितले. या वेळी तपासी अधिकारी नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक राजेद्र सानप उपस्थित होते. फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम, असा सुमारे 4 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 26 एप्रिल 2021 रोजी या गुन्ह्यातील आरोपींनी संगनमत केले. शरीरसंबधाचे अमिष दाखविले. महिलेसोबत शरीर संबध ठेवणे भाग पाडले. त्याचा व्हिडिओ बनवला होता. एक कोटी रुपये आणून दे, नाहीतर तो हा व्हिडिओ पोलिसांना दाखवून तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी आरोपी महिलेने दिली होती. फिर्यादीच्या गळ्यात असणारे 5 तोळे वजनाची 2 लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन, हातातील साडेसहा तोळे वजनाच्या 4 अंगठ्या व रोख रक्कम 84 हजार 300 रुपये, असा एकुण 5 लाख 44 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी महिलेसह तिला मदत करणा-यास अटक करण्यात आली आहे.
सहायक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पोलीस पथकासह जखणगाव येथे राहणारी आरोपी महिलेले ताब्यात घेतले. सदरचा गुन्हा हा तिने व तिचा साथीदार मिळून केल्याची माहिती दिली. महिलेने सदरची चेन ही भिंगार अर्बन बँकमध्ये तिच्या भावाच्या नावे गहाण ठेवली होती. ती बँकेतून ताब्यात घेण्यात आली आहे. तसेच तिच्या घरामधे सदर गुन्ह्यातील अंगठी व रोख रक्कम 69 हजार 300 रुपये जप्त करण्यात आली. तिचा साथीदार याचेकडुन गुन्ह्यातील 15 हजार रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती राजेंद्र सानप यांनी दिली.

