शेतक-याने 'या' पिकाची लागवड केल्याने झाली अटक, पोलिसांनी केला पिकाचा पंचनामा
By Admin
शेतक-याने शेतात 'या' पिकाची लागवड केल्याने झाली अटक,पोलिसांनी पिकाचा पंचनामा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 16 मे,रविवार
सविस्तर असे की १५ मे रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, तालुक्यातिल मांडवगण शिवारात ऐक इसम नामे रामदास गेणु रायकर रा.मांडवगण, ता.श्रीगोंदा जि. अहमदनगर हा त्याचे शेतात गांजाचे झाडांची शेती करत आहे.
त्याबाबत पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांना सदरची माहीती देवुन, छाप्याविषयी नियोजन केले. मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी मांडवगण शिवारात छापा मारला असता, आरोपी रामदास गेणु रायकर याने त्याचे शेतात गांजाचे झाडांची लागवड केली असल्याचे पोलिसांना दिसले. शेताची झडती घेतली असता, शेतात लहान मोठी एकुण ११० गांज्याची झाडे मिळुन आली.त्यांची मोजणी केली असता वजन ५४ किलो.भरले असून त्याची किंमत प्रत्येकी १० हजार रु. प्रतिकिलो प्रमाणे असून ते एकुण पाच लाख चाळीस हजार किंमतीचा ओला पाला असलेला मिळुन आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करुन ते जप्त केले आहे.
आरोपीने गावापासुन दुर अंतरावर माळरान शेतावर कोणाच्या नजरेस पडणार नाही. अश्या ठिकाणी गांजाचे झाडांची चोरटी विक्री करण्याचे उददेशाने लागवड केली असल्याचे दिसुन आले. सदरचे नशाकारक पदार्थ गांजा हे केंद्रशासनाने प्रतिबंधित केले असल्याने, पो कॉ किरण बोराडे यांचे फिर्यादी वरुन, पोलीस स्टेशनला एन.डी.पी.एस.अँक्ट १८८५ कलम २० (क) (ख) (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपीस गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे.
पुढील तपास स पो नि दिलीप तेजनकर हे करीत आहेत. सदरची कामगिरी मनोज पाटील सो, पोलीस अधिक्षक अहमदनगर, सौरभकुमार अग्रवाल सो, अप्पर पोलीस अधिक्षक अहमदनगर, अण्णासाहेब जाधव सो, (उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग कर्जत) यांचे मार्गदर्शनाखाली (श्रीगोंदा पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, (तालुका कृषी अधिकारी) पद्मनाभ म्हस्के तसेच श्रीगोंदा पोस्टेचे (सपोनि) दिलीप तेजनकर, पोहेकॉ अंकुश ढवळे, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ दादा टाके, पोकॉ गोकुळ इंगवले, किरण बोराडे, पोकॉ प्रकाश दंदाडे यांनी केली आहे.
५ लाख ४० हजार रु. किंमतीच्या ५४ किलो गांजाची ११० झाडे जप्त.. पोलिसांची कारवाई..

