पाथर्डी शहरातील 'या' ठिकाणी रस्त्यावर खडी पसरुन ठेवल्याने वाहनचालक गाडीवरुन घसरुन होतात जखमी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - गुरुवार 06 मे 2021
पाथर्डी शहरात राष्ट्रीय महामार्ग (61) चे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराने आंबेडकर चौक येथे मोठ्या प्रमाणात खडी पसरवून ठेवली असल्याने दुचाकी वाहन धारकांना येथून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.अनेकदा सांगून देखील ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने अनेक वाहनधारक या खडी वरून घसरून पडत आहेत.यामध्ये काही जखमी होत असून काहींच्या वाहनांचे नुकसान होत आहे.तरी ठेकेदाराने तात्काळ यावर मुरूम टाकून रस्ता वाहतुकीस योग्य करावा अशी मागणी वाहन धारकातून तसेच परीसरातील नागरीकांकडून होत आहे.