पाथर्डी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत प्रवरा विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे सुयश
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील भुतेटाकळी येथील प्रवरा माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सपना शिरसाट हिने धावणे स्पर्धेत अटीतटीच्या शर्यतीत विद्यालयास यश प्राप्त करून दिले.
बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या मैदानात नुकत्याच मैदानी स्पर्धा संपन्न झाल्या. या मैदानी स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात ४०० मीटर धावणे शर्यतीमध्ये भुतेटाकळी विद्यालयाची विद्यार्थिनी कु. सपना नारायण शिरसाट हिने अटीतटीच्या शर्यतीत द्वितीय क्रमांक मिळवला. तिचे भुतेटाकळी ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
सपना शिरसाट हीस क्रीडा शिक्षक श्री. टाकळकर व कर्मचारी अशोक खेडकर यांचे बहुमोल मार्गदर्शन मिळाले. या यशाबद्दल या दोन कर्मचाऱ्यांचा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आसिफ पठाण यांनी सत्कार केला.
सत्कार समारंभाच्या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.