महाराष्ट्र
34661
10
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
By Admin
मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
नगर-मनमाड रस्त्यावर सुरू होता काळाधंदा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरात नगर-मनमाड रस्त्यालगत असलेल्या अँक्युम मसाज पार्लर-स्पा सेंटर वर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने छापा टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. ही कारवाई ११ डिसेंबर रोजी सायंकाळी करण्यात आली. स्पाच्या नावाखाली महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सेंटरचा व्यवस्थापक अनिकेत अशोक बचाटे (वय २७), महेश
अमित सुंदराणी (वय २०) यांना ताब्यात घेण्यात आले.
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना ११ डिसेंबर रोजी गोपनीय माहिती मिळाली की, नगर-मनमाड रस्त्यावरील अँक्युम मसाज पार्लर-स्पा सेंटर वर मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू आहे. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरूवारी बनावट ग्राहक तयार करून त्याला स्पा सेंटरमध्ये पाठवले. बनावट ग्राहकाने खात्री करून माहिती दिल्यानंतर सायंकाळी सात वाजता स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला. स्पा सेंटरचा
५ महिलांची सुटका, दोघे अटकेत
व्यवस्थापक अनिकेत बचाटे याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या अंगझडतीत वेश्याव्यवसायातून कमावलेली रोख रक्कम व दोन मोबाईल फोन जप्त करण्यात आले. ग्राहक महेश सुंदराणी यालाही ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी पाच पीडित महिलांची सुटका केली आहे. या महिला वेगवेगळ्या ठिकाणच्या असून त्यांना पैशांचे आमिष दाखवून या व्यवसायात ढकलण्यात आले होते. या महिलांकडून शरीरसंबंधासाठी घेतलेली रोख रक्कम आणि अन्य वस्तू जप्त करण्यात आल्या. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Tags :
34661
10




