शेवगाव पोलीस स्टेशन चे माजी कर्मचारी सध्या नगर येथे नियुक्तीस असलेले हेड कॉन्स्टेबल संजय बडे यांचे रस्ते अपघातात दुःखद निधन
शेवगाव तालुका नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगांव पोलिस उपविभागीय कार्यलयात बरीच वर्षे नेमणुकीस असलेले शेवगांव तालुका सायकल असोसिएशन चे सक्रिय सदस्य हल्ली पोलिस मुख्यालय अहमदनगर येथे नेमणुकीस असलेले हेड कॉन्स्टेबलन *कै. श्री. संजय बडे वय 55 रा खंडोबानगर शेवगांव मुळ गांव येळी ता पाथर्डी यांचे रस्ते अपघातात गंभीर जखमी होऊन अहिल्यानगर मधील मॅक्स केअर हॉस्पीटल येथे उपचारा दरम्यान. आज दिनांक 21 ऑक्टोबर वार सोमवारी सकाळी 08:00 वाजता निधन झाले. ते शेवगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत असताना मोठा मित्र परिवार त्यांनी जमा केला होता सायकलवर त्यांनी अयोध्या पंढरपूर सह संपुर्ण भारत भ्रमण केले होते ते धार्मिक वृत्तीचे चांगले व्यक्तिमत्व होते त्यांच्या अचानक अपघाती निधनाने शेवगांव शहरासह पाथर्डी तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करो हीच ईश्वरचरणी प्रार्थना शेवगाव शहराच्या वतीने भावपूर्ण श्राद्धांजली