महाराष्ट्र
8479
10
शिवाजी महाराजांचा इतिहास आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा
By Admin
शिवाजी महाराजांचा इतिहास आयुष्यभर जपून ठेवण्यासारखा- प्रांताधिकारी प्रसाद मते
पंचायत समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी
पाथर्डी प्रतिनिधी:
संपूर्ण देशाचे आराध्य दैवत असलेले हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाला लाभले, हे आपले भाग्य आहे, असे प्रतिपादन प्रांताधिकारी प्रसाद मते यांनी केले. ते पंचायत समिती येथे छत्रपती शिवाजी महाराजांची ३९५ वी जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
प्रांताधिकारी मते पुढे म्हणाले की, आपण अस्तित्वात आहोत याचे एकमेव कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय. शिवाजी महाराजांचा इतिहास, गौरव, त्यांची कामे आपल्या मनात आयुष्यभर जपून ठेवण्या सारखी आहेत. शिवाजी महाराजांचे अनेक पुस्तके मॅनेजमेंट वर आधारित आहे. इतर देशातही त्यांचे राज्यकारभाराविषयी पुस्तके आहेत. आपण छत्रपतींना अजरामर करावे.
प्राचार्य अशोक दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली श्री तिलोक जैन विद्यालयातून निघालेली हजारो विद्यार्थ्यांची शोभायात्रा (पदयात्रा) ढोल ताशांच्या गजरामध्ये शिवाजी महाराजांचा विजय असो.. अशा घोषणांनी पंचायत समिती येथे येऊन पोहोचली. या पदयात्रेत प्रांताधिकारी प्रसाद मते, गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार आदी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी येथील गीत मंचाचा शिवाजी महाराजांच्या कार्यावर बहारदार गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रा. जनार्धन बोडखे व आकाश उरसूळे यांनी शिवाजीचे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती..आनंदाने नांदत होती हिंदू- मुसलमान.. अशा पहाडीदार गितामधून शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रबोधन केले. ढोलकीची साथ राजेंद्र चव्हाण यांनी दिली तर सचिन साळवे यांनी हार्मोनियमची साथ संगत केली तसेच अक्षय वायकर यांनी कोरसची साथ दिली.
या कार्यक्रमास प्रांताधिकारी प्रसाद मते, गट विकास अधिकारी शिवाजीराव कांबळे, तहसीलदार डॉ. उद्धव नाईक, गटशिक्षणाधिकारी अनिल भवार श्री तिलोक जैन विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड, पर्यवेक्षक दिलावर फकीर, अजय भंडारी, सुनिल कटारिया, संतोष घोगरे, केंद्रप्रमुख रामदास लांघी तसेच महिला शिक्षिका, पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :

