महाराष्ट्र
1478
10
बाल आनंद मेळाव्यात हजारोंची उलाढाल
By Admin
बाल आनंद मेळाव्यात हजारोंची उलाढाल
विद्यार्थ्यांनी लावले खाद्यपदार्थसह विविध १३० स्टॉल्स
पाथर्डी प्रतिनिधी:
शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच व्यवहार ज्ञानही आत्मसात करता आले पाहिजे, विद्यार्थ्यांना गणिती क्रिया आत्मसात व्हाव्यात तसेच त्यातून तो भविष्यकाळात सक्षम नागरिक बनला पाहिजे या उद्देशाने शहरातील एकलव्य शिक्षण संस्थेचे एम. एम. नि-हाळी विद्यालयात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी खूप चविष्ट व चटकदार तसेच आरोग्यदायी खाद्यपदार्थ बनवून आणले होते. मेळाव्याचा विद्यार्थी सह पालकांनी आनंद घेतला.
स्टॉल धारक विद्यार्थ्यांनी स्टॉलची मांडणी, विविध पदार्थाची केलेली खरेदी विक्री गणिती क्रिया प्रत्यक्षात अमलात आणल्याचे पाहून पालकचकीत झाले, आम्ही केलेल्या पदार्थाची चव घ्या. म्हणून विद्यार्थी आग्रह करत होते. मान्यवरांनी पदार्थ चांगला झाला असे सांगितले की, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्ट दिसत होता. बुधवारी येथील आठवडे बाजार असूनही त्यापूर्वीच येथील बाजारात हिरव्यापालभाज्या , भेळ, खेळणी, पाणीपुरी, वडापाव, तसेच विविध खाद्यपदार्थ सोबत पेरू, चिकु, बोरे, संत्री, आसाराम मेवा विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणला होता. इयत्ता पहिली ते दहावी विद्यार्थ्यांनी स्टॉल लावलेले होते. विद्यार्थ्यांनी सेफ ची वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा धारण केली होती. विद्यार्थ्यांनी हजारो रुपयाची उलाढाल केली.
मेळाव्याचे उद्घाटन एकलव्य शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष कांतीलाल गुगळे, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, शिक्षण विस्ताराधिकारी रामनाथ कराड, विश्वस्त श्रीकांत नि-हाळी, समन्वयक बाळकृष्ण जोशी, नगरसेवक देवा पवार, नगरसेविका सविता भापकर, सुरेखा हंडाळ, माणिकराव पालवे, संजय दहिफळे, विद्यालयाचे प्राचार्य संजय घिगे आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळासाहेब घुले, सूत्रसंचालन गणेश सरोदे यांनी केले तर आभार राधाकृष्ण कोठे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता संतोष लोहाडे, गणेश कुदळ, विठ्ठल वारकड, गिरीश जोर्वेकर, गणेश खेडकर, राजेंद्र राठोड, रामनाथ चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags :
1478
10




