महाराष्ट्र
सुनिल कटारिया उत्कृष्ट विज्ञान संघटक पुरस्काराने सन्मानित
By Admin
सुनिल कटारिया उत्कृष्ट विज्ञान संघटक पुरस्काराने सन्मानित
पाथर्डी प्रतिनिधी:
शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयातील कृतीशील विज्ञान शिक्षक सुनिल कटारिया यांना अहमदनगर जिल्हा विज्ञान संघटनेमार्फत उत्कृष्ट विज्ञान संघटक पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. पटेल मंगल कार्यालय, अहिल्यानगर या ठिकाणी झालेल्या भव्य समारंभात मा. शिक्षण संचालक दिनकर टेमकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्रा.अजिंक्य भोर्डे, राज्य विज्ञान संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय आरोटे, दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके, विज्ञान संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष बळीराम गरड, विद्यमान अध्यक्ष बद्रिनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले.
सुनिल कटारिया हे ९ वर्षापासून जिल्हा विज्ञान अध्यापक संघाचे सदस्य असून पाथर्डी तालुका विज्ञानअध्यक्ष व तालुका परीक्षा प्रमुख या पदावर कार्य करीत आहेत. या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागातील प्रत्येक शाळेपर्यंत पोहचून विज्ञान स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान प्रवाहात आणण्याचे सातत्याने कार्य केलेले आहे. या बरोबरच सेवा कालावधीत विज्ञान क्षेत्रासाठी दिलेले योगदान, इन्स्पायर अवॉर्ड, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, राज्य विज्ञान प्रदर्शन, अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावे, अपूर्व मेळावे, विज्ञान नाट्य महोत्सव, भारतीय मानक ब्युरो अंतर्गत स्टॅंडर्ड क्लब मधील विविध जनजागृतीपर उपक्रम, विविध राज्यस्तरीय प्रशिक्षणात बजावलेली तज्ञ मार्गदर्शकाची भूमिका, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षणे, विविध सामाजिक संघटनेतील योगदान यासह शैक्षणिक क्षेत्रातील यापूर्वी मिळालेले विविध पुरस्कार या सर्व बाबींचा विचार करून संघटनेने त्यांची सदर पुरस्कारा साठी निवड केली व त्यांना सन्मानीत केले.
त्यांच्या या पुरस्काराबद्दल श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष चंपालाल गांधी, सचिव सतिश गुगळे, खजिनदार सुरेश कुचेरिया, विश्वस्त धरमचंद गुगळे, डॉ . ललित गुगळे, राजेंद्र मुथ्या, विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड, पर्यवेक्षक दिलावर फकीर, अजय भंडारी, सुधाकर सातपुते,श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे कार्यकारी व सल्लागार मंडळाचे सर्व सदस्य यांनी विशेष अभिनंदन केले. यासह शिक्षण क्षेत्रातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे.
Tags :
59412
10