राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ; बाळासाहेब थोरात यांची आढावा बैठक
नगर सिटीझन live टिम-
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कोरोना आढावा बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातल्याने, बैठकी मधून त्या कार्यकर्त्याला पोलिसांनी बाहेर काढले. जिल्ह्यातील कोरोना संदर्भात थोरात यांनी अकोले पंचयत समितीमध्ये आढावा बैठक घेतली.
यावेळी बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रवी मालुंजकर यांनी तुमच्या संगमनेर मध्ये जास्त रेमडेसिव्हिर इंजेक्शन कसे मिळतात? आणि अकोले तालुक्याला कमी का मिळतात असा अन्याय का? असा सवाल मालुंजकर यांनी थोरातांना केल्याने बैठकीमध्ये काहीकाळ चांगलाच गोंधळ उडाला.
या गोंधळात अखेर पोलिसांना हस्तक्षेप करत मालुंजकर यांना पंचायत समितीच्या बैठकीच्या सभागृहाततून बाहेर काढावे लागले.
दरम्यान, जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा रोज नवा उच्चांक होत आहे. मागील काही दिवसांपासून तीन हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर थोरात यांनी आढावा बैठक घेतली.