महाराष्ट्र
8187
10
प्रश्नपत्रिका पहिल्यांदा वाचा आणि मगच सोडवा; दहावी
By Admin
प्रश्नपत्रिका पहिल्यांदा वाचा आणि मगच सोडवा; दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाकडून महत्त्वाच्या सूचना, 'असा' लिहा पेपर
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सुट्या कागदावर अथवा प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करू नका. उत्तरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समास सोडू नका. केवळ डाव्या बाजूलाच समास सोडा."
इयत्ता बारावीची परीक्षा (Class 12th Exam) मंगळवारी (ता.११), तर दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर उत्तरपत्रिका (Answer Sheet) लिहिण्याबाबत विविध सूचना राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (State Board of Secondary and Higher Secondary Education) विद्यार्थ्यांना केल्या आहेत.
प्रश्नपत्रिका मिळताच तिच्या वरील भागावर, प्रत्येक पानावर उजव्या बाजूस विद्यार्थ्यांनी स्वतःचा बैठक क्रमांक लिहावा. निर्धारित दहा मिनिटांत प्रश्नपत्रिकेचे फक्त वाचन करावे. त्यानंतर उत्तरपत्रिकेच्या पान क्रमांक तीनपासून उत्तरे लिहिण्यास सुरुवात करावी. उत्तरपत्रिकेवर निळ्या अथवा काळ्या शाईचाच वापर करावा. अन्यथा, मजकुरास गुणदान केले जाणार नाही.
कच्चे लिखाण करावयाचे असल्यास ते पेन्सिलनेच आणि उत्तरपत्रिकेच्या डाव्या हाताच्या पानावर करावे. त्यावर 'कच्चे लिखाण' असा स्पष्ट उल्लेख करावा. सुट्या कागदावर अथवा प्रश्नपत्रिकेवर कच्चे लिखाण करू नका. उत्तरपत्रिकेच्या पानाच्या दोन्ही बाजूस समास सोडू नका. केवळ डाव्या बाजूलाच समास सोडा. पर्यवेक्षकाकडून घेतलेल्या उत्तरपत्रिकेवर आणि पुरवण्यांवर पर्यवेक्षकाची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी, आदी सूचना बोर्डाने विद्यार्थ्यांना केल्या आहेत.
विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचे
परीक्षेला येताना प्रवेशपत्र, ओळखपत्र रोज बरोबर आणावे.
पर्यवेक्षकांकडून बारकोड स्टिकर मिळाल्यानंतर विषय, बैठक क्रमांकाची खात्री करावी. उपस्थिती पत्रकावर बैठक क्रमांक, बारकोड स्टिकर क्रमांक लिहून स्वाक्षरी करावी. त्यानंतर बारकोड स्टिकर उत्तरपत्रिकेवर दिलेल्या जागेवरच चिकटवावे.
उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्ठावर, पुरवणी उत्तरपत्रिकेवर ठराविक रकान्यात बैठक क्रमांक अंक, अक्षरात बिनचूक लिहून स्वाक्षरी करावी.
'उत्तरपत्रिका लिहिण्यापूर्वीच्या विविध सूचना विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयांच्या माध्यमातून देण्यात आल्या आहेत. त्यानुसार त्यांनी काळजीपूर्वक कार्यवाही करावी. शिक्षकांकडून या सूचना जाणून घ्याव्यात.
- राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ
Tags :
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/like.png)
![](https://nagarcitizenlive.com/assets1/img/core-img/chat.png)