आमदार राजीवजी राजळे यांचे ५६ व्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय चित्रकला /पोस्टर स्पर्धेचे आयोजन
पाथर्डी तालुका -
स्व.आमदार राजीवजी राजळे यांचे ५६ व्या जयंतीनिमित्त तालुका स्तरीय चित्रकला /पोस्टर स्पर्धेचे आयोजन
करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक ०९.०० वाजता डॉ. विनायकराव हाडके, व मा. राहुल दादा राजळे, विश्वस्त श्री दादा पाटील राजळे शिक्षण संस्था, यांच्या शुभहस्ते व मा. रामकिसन आबा काकडे, उपाध्यक्ष श्री दादापाटील राजळे शिक्षण संस्था, यांचे अध्यक्षतेखाली दादापाटील राजळे महाविद्यालय आदिनाथ नगर येथे होणार आहे. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व प्रमाणपत्र लगेचच वितरित करण्यात येईल. ही स्पर्धा ५ वी ते ७ वी, ८ वी ते १० वी व ११ वी ते महाविद्यालयीन विद्यार्थी अशा तीन गटात घेण्यात येणार आहे. तरी तालुक्यातील सर्व विद्यार्थी - विद्यार्थिनींनी या स्पर्धेत भाग घ्यावा. असे प्राचार्य डॉ. राजधर टेमकर व प्रा. मेहबूब तांबोळी यांनी आवाहन केले आहे.