महाराष्ट्र
श्री तिलोक जैन विद्यालयात कॉपीमुक्त अभियान सप्ताह उत्साहात सुरु
By Admin
श्री तिलोक जैन विद्यालयात कॉपीमुक्त अभियान सप्ताह उत्साहात सुरु
गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांनी विद्यार्थ्यांना दिली कॉपीमुक्तीची शपथ
पाथर्डी प्रतिनिधी:
शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमांतर्गत पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या दहावी - बारावी परीक्षेसाठी कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी शिक्षण विभागाअंतर्गत तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
या अनुषंगाने सदर उपक्रमाचा शुभारंभ शहरातील श्री तिलोक जैन विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देवून करण्यातआला.यावेळी गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ दिली.यावेळी विद्यालयाचे प्राचार्य अशोक दौंड,पर्यवेक्षक दिलावर फकीर,सुधाकर सातपुते या सह सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
राज्यात बोर्डाच्या परीक्षेत होणारे कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी विविध निर्णय घेण्यात आले आहेत. या संदर्भात माहिती देऊन लोकांना जागृत करण्यासाठी दिनांक २० ते २६ जानेवारी २०२५ या दरम्यान माध्यमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या मार्गदर्शनाखाली कॉपीमुक्त अभियान संपूर्ण जिल्हाभर राबविण्यात येणार आहे.या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी या सप्ताहात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथ देणे, कॉपी केल्यास कोणती शिक्षा होणार याबाबत माहिती देणे,परीक्षेसंदर्भात माहिती पुरवणे, परीक्षेत तणाव न घेता अभ्यास कसा करावा याबाबत जनजागृती करणे,शाळा स्तरावर मंडळ शिक्षासूचीचे वाचन करणे,मंडळाच्या उत्तर पत्रिकेच्या मुखपृष्ठा मागील सूचना व प्रवेशपत्रावरील सूचना यांचे वाचन करणे, परीक्षा काळात विद्यार्थ्यांनी घ्यावयाचा आहार व आरोग्याची काळजी या बाबत तज्ञामार्फत कार्यशाळा आयोजित करणे, राज्य मंडळांने तयार केलेली चित्रफीत विद्यार्थ्यांना दाखवणे अशा प्रकारच्या विविध उपक्रमांचे आयोजन संपूर्ण तालुक्यात करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अनिल भवार यांनी दिली.
Tags :
13954
10