महाराष्ट्र
कार्यालयातच नियमांचे उल्लंघन : एजंटांची वाहने दुभाजकावर उभी
By Admin
कार्यालयातच नियमांचे उल्लंघन : एजंटांची वाहने दुभाजकावर उभी
प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर (आरटीओ-RTO)
इथे दंड कोण करणार ?
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
जिल्ह्याचे मुख्यालय
असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाबाहेर प्रवेशद्वाराच्या बाजूला दुचाकी अस्ताव्यस्त उभी असतात. तसेच, एजंटांची वाहने तर थेट दुभाजकावर उभी केली जात असून, आरटीओ कार्यालयाबाहेर नियमांची पायमल्ली होत आहे. त्यामुळे आरटीओ साहेब इथे दंड कोण करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्वी तारकपूरला होते. तिथे जागा कमी होती. त्यामुळे आरटी कार्यालयाला वाहनतळाचे स्वरूप येत होते. आता उपप्रादेशिक कार्यालयाचे रूपांतर प्रादेशिक परिवहन कार्यालयात झाले. कार्यालयाला नगर- सोलापूर रोडवर प्रशस्त इमारत मिळाली.
ऑनलाईन सेवा, तरीही
कामे एजंटांमार्फतच
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सर्व सेवा ऑनलाईन झाल्या आहेत. वाहन परवान्यापासून ते दंड भरण्यापर्यंतच्या सर्व सेवा ऑनलाईन असल्याचे सांगितले जाते. मात्र, तरीही आरटीओ कार्यालयात एजंटांचा वावर असतो. ते कामे घेऊन येतात आणि अधिकारी ते करून देतात, असे चित्र आरटीओ कार्यालयात पाहायला मिळते. सेवा ऑनलाईन झाल्या तर एजंट कशाला हवेत, असा प्रश्न सामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
अहिल्यानगर येथील आरटीओ कार्यालयाच्या बाहेर एजंटांकडून असा रस्त्याच्या दुभाजकावर कामे सुरु असतात.
या इमारतीतून जिल्ह्याचा कारभार चालतो. वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती केली जाते. परंतु, याच कार्यालयाबाहेर वाहतुकीचे नियम डावलून वाहने उभी केली जातात. आरटीओ कार्यालयातच नियम पाळले
जात नाहीत. कार्यालयाच्या वाहनतळातही शिस्तीत वाहने उभी केली जात नाहीत. जिथे वाटेल तिथे वाहने उभी केली जातात. वाहन उभे करून नागरिक कार्यालयात जातात. ते बाहेर येईपर्यंत वाहन तसेच उभे असते.
अशा वाहनांमुळे इतरांनाही त्रास होतो. परंतु, आरटीओ कार्यालयातच अशी बेशिस्त बोकाळली असेल तर त्यापासून सामान्यांनी काय धडा घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Tags :
69651
10