महाराष्ट्र
44398
10
नवजीवन स्कूलचा विज्ञान सेतू स्पर्धेत घवघवीत यश
By Admin
नवजीवन स्कूलचा विज्ञान सेतू स्पर्धेत घवघवीत यश
सिन्नर तालुका न्यूज नेटवर्क-
डी पी खर्डे नवजीवन कॉलेज ऑफ फार्मसी नांदूर शिंगोटे यांच्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या नवजीवन एज्युकेशन सोसायटीचे मॅनेजिंग ट्रस्टी श्री सुभाषजी देशमुख (बडे सर) चेअरमन विजयाताई देशमुख (बडे मॅडम) संचालिका शिरीन देशमुख (दीदी) यांनी विद्यार्थ्यांना व विज्ञान शिक्षकांना नेहमीच प्रोत्साहन दिले व विविध विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभागी होण्यासाठी उत्तेजित व मार्गदर्शन केले राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी या दिवशी CV रामन यांनी 1928 मध्ये लावलेल्या रामन प्रभावाच्या शोधाच्या सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो हा दिवस दैनंदिन जीवनात विज्ञानाचे महत्त्व अधोरेखित करत असतो आणि विद्यार्थ्यांना वैज्ञानिक स्वभाव,कुतूहल,व नवकल्पना विकसित करण्यासाठी नोबेल पुरस्काराने सन्मानित झालेले थोर शास्त्रज्ञ भारतरत्न सी व्ही रामन यांनी विज्ञान विश्वाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले हाच आदर्श मानत शाळेतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन त्यांनी यश संपादन केले प्राथमिक गटात एंगेस्ट शास्त्रज्ञ म्हणून कु आरोही विजय शेळके विद्यार्थिनीला पारितोषिक मिळाले इयत्ता सातवी ते नववी या गटात आराध्य एखंडे व द्रोण कराड यांना रोख रक्कम दोन हजार रुपये व सन्मान चिन्ह मिळाले या स्पर्धेत एकूण वीस विद्यार्थी सहभागी झाले होते निखिल पवार, तन्मय तनपुरे, वीरेंद्र सोनवणे, ऋतुराज कुटे,हार्दिक काळे, ईशान पवार, प्रतीक शर्मा ,श्लोक घुगे, समर्थ हंडोरे ,श्रेयश खोले ,हर्ष गीते, तन्मय काकड ,संचित बागुल, विपुल पांडे ,आरोही बोडके ,आरोही बर्वे ,या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले या या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे विज्ञान शिक्षक श्री निलेश भावसार सर सौ गौरी परदेशी मॅडम सौ प्रियंका देशपांडे मॅडम स्नेहा बेलोटे मॅडम यांचे संस्थेच्या वतीने श्री बी. बी. पाटील सर (शिक्षण अधिकारी )यांनी अभिनंदन व कौतुक केले तसेच शाळेच्या प्राचार्य सौ अनिता सूर्यवंशी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ सविता फड प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ प्रीती गुजराथी सौ योगिता भाटजिरे, श्री नरेंद्र वाघ सर, सौ सविता चासकर ,श्री संदीप काळे सर ,श्री राहुल चव्हाण सर श्री शरद शिंदे सर क्रीडा शिक्षक श्री अमर बैरागी सर ,श्री जितेंद्र शिंदे सर व शिक्षक व शिक्षकेतर तर कर्मचारी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व विज्ञान शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक केले
Tags :
44398
10




