धक्कादायक प्रकार उघडकीस, रुग्णवाहिकेतून देशी दारुची वाहतूक
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी - 23 एप्रिल 2021
रुग्णांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यासाठी रुग्णवाहीका मिळत नसून इकडे काही लोक रुग्णवाहीकेचा गैरवापर करत आहेत.
देशी दारूची वाहतूक होत असलेली रूग्णवाहिका संगमनेर शहर पोलिसांनी शुक्रवारी (दि. २३) सकाळी अकरा वाजेच्या सुमारास पकडली.
संगमनेर बसस्थानकासमोर नाकाबंदी करण्यात आली आहे. पोलीस वाहनांची तपासणी करत असताना तेथून जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकूंद देशमुख यांनी थांबण्याचा इशारा केला.
या रुग्णवाहिकेची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात देशी दारु आढळून आली. रुग्णवाहिका व त्यातील दोघांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.