दादापाटील राजळे महाविद्यालयात प्रेमचंद जयंती साजरी
By Admin
दादापाटील राजळे महाविद्यालायात प्रेमचंद जयंती साजरी
पाथर्डी - प्रतिनिधी
प्रेमचंद यांचे साहित्य आजच्या समाजाचा आरसा आहे. आजच्या समाजाचे वास्तव रूप प्रेमचंद यांच्या साहित्यातून दिसून येते. प्रेमचंद यांचे साहित्य कृषक, दलित, स्त्रीवर्गाच्या वेदनेचे वास्तव चित्रण आहे. समाजातील वाईट रूढी, परंपरा, चालीरीती यावर प्रेमचंद यांनी आपल्या साहित्यातूर प्रखर विरोध केलेला दिसून येतो. त्यांचे साहित्य म्हणजे समाजाच्या डोळ्यात अंजन घालण्यासारखे आहे, असे विचार दादापाटील राजळे महाविद्यालयातील विज्ञान विभाग प्रमुख डॉ. जनार्दन नेहूल यांनी व्यक्त केले, महाविद्यालयातील हिंदी विभागाने आयोजित केलेल्या प्रेमचंद जयंती कार्यक्रमात त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. अनिता पाटोळे यांनी केले, आपल्या प्रास्ताविकात त्यांनी प्रेमचंद यांच्या साहित्याचे अनेक पैलू उलगडून सांगितले, हिंदी व उर्दू भाषे मध्ये लिखित प्रेमचंद यांचे साहित्य बहुमूल्य आहे, त्यांनी स्व स्वातंत्र्यपूर्व काळात लोकांचे शोषण, दुःख, दारिद्र्य, जातीयता इ. गोष्टीमुळे होणारी लोकांची पिळवणूक समाजा समोर मांडली, आपल्या कथांमधून त्यांनी ग्रामीण तथा शहरी अशा दोन्ही प्रकारच्या जीवनाचे चित्रण केलेले दिसून येते . त्यांच्या साहित्याचे ध्येय केवळ मनोरंजन नसून वास्तव जीवनाचे दर्शन घडवणे आहे . सुधारणावाद, समाजवाद, गांधीवाद त्यांच्या साहित्यातून दिसून येतो. त्यांच्या साहित्याचा विषय भिकाऱ्यां पासून राजा - महाराजापर्यंत, श श्रीमंत - गरीब, बालकांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वसमावेशक असलेला दिसून येतो, प्रेमचंद यांचे साहित्य हे हिन्दी साहित्याला मिळालेली देणगी आहे . हे विविध उदाहरणे देऊन मांगितले . या कार्यक्रमासाठी डॉ. गंगाधर लवांडे, डी. जालिंदर कानडे, डॉ. सुभाष भगवान देशमुख, डॉ. विलास बनसोडे, प्रा. चंद्रकांत पानसरे, डॉ. राजकुमार घुले , अश्वीनी मरकड व महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते, महाविद्यालयातील ग्रंथालयात या वेळी प्रेमचंद यांच्या पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले.

