गंगामाई साखर कारखाना - मागण्या मान्य होईपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही - नवनाथराव इसरवाडे
By Admin
गंगामाई कारखाना - मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही :- नवनाथराव इसरवाडे
गंगामाई कारखाना विरोधात आमरण उपोषणावर ठाम राहण्याचा निर्णय
विविध संघटनांचा आमरण उपोषणास पाठिंबा.
.................................................................
नगर सिटीझन live team-
जोपर्यंत आमच्या संपूर्ण मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत शेवगाव तहसिल कार्यालय येथे सुरू केलेले आमरण उपोषण सोडणार नाही असा निर्धार शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी केला असून आज सोमवार दि.१५ मार्च पासून ते शेवगाव तहसिल कार्यालय येथे उपोषणास बसले आहे.
शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील शिवसंग्राम पक्षाचे शेवगाव तालुका अध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी दि. ०८ मार्च रोजी शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्या विरोधात शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात तहसीलदार अर्चना पागिरे यांना लेखी निवेदन दिले होते. शिवसंग्राम पक्षाने तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, ऊस उत्पादकाचे पेमेंट १४ दिवसांत मिळावेत, हार्वेस्टिंग मशीनने ऊस तोडणी झालेल्या ऊसाचे वाढे व पाचरटच्या वजनाची कपात फक्त १ टक्का करावी, ऊसाचे पेमेंट एफ आर पी पेक्षा जास्त ३०० रुपयांनी करावे, शेतकऱ्यांच्या तोडणी झालेल्या ऊसाचे वजन कोणत्याही वजन काट्यावर करण्यास परवानगी द्यावी तसेच कारखान्याचे कामचुकार कर्मचारी नोंद घेण्यास टाळाटाळ करतात त्यांना कारखान्यातुन काढुन टाकण्यात यावे आदी मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले. सदरील होणाऱ्या आमरण उपोषणास परीसरातील शेतकऱ्यासह विविध सामाजिक संघटनेच्या कार्यकत्यांनी व पदाधिकाऱ्यानी पाठींबा दिला आहे. तसेच सदरील उपोषण स्थळी गंगामाईच्या साखर कारखान्याचे कर्मचाऱ्यांनी समक्ष येऊन उपोषण कर्त्याची भेट घेतली असून कारखान्याचे कर्मचारी तसेच उपोषण कर्त्यांची तहसीलदार अर्चना पागिरे यांनी मध्यस्थी केली मात्र त्यामधून कुठलाही ठोस पर्याय न निघाल्याने सदरील उपोषण हे चालूच ठेवावे लागले अशी माहिती शिवसंग्राम पक्षाचे तालुका अध्यक्ष नवनाथ इसरवाडे यांनी दिली आहे.
"गंगामाई साखर कारखान्यात उसाच्या वजन काट्यासह, उसाच्या पेमेंटसाठी करण्यात येत असलेली दिरंगाई, काबाडकष्ट करून पिकवलेल्या उसासाठी शेतकऱ्यांची होत असलेली भजेती आणि मुजोर कर्मचाऱ्यांकडुन नोंद घेण्यासाठी केलेली टाळाटाळ ह्या सर्व गोष्टी शेतकऱ्यांविरोधी असल्याने उपोषणातील मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषणावर ठाम राहणार आहे."
( नवनाथ ईसरवाडे - तालुकाध्यक्ष- शिवसंग्राम पक्ष शेवगांव)