एन.एन.एस. स्वयंसेवकांची नदी स्वच्छता व संवर्धन मोहीम
By Admin
एन.एन.एस. स्वयंसेवकांची नदी स्वच्छता व संवर्धन मोहीम
बाबूजी आव्हाड महाविद्यालय एनएनएस चे एकदिवसीय शिबिर संपन्न
पाथर्डी प्रतिनिधी:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व बाबुजी आव्हाड महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित एक दिवसीय नदी स्वच्छता व संवर्धन शिबिराचे आयोजन शहरातील हनुमान बाग नदीपात्र या ठिकाणी करण्यात आले. या शिबिरामध्ये शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक सहभागी झाले.
या दोन्ही तालुक्यातील महाविद्यालयातील स्वयंसेवकांना या शिबिरामध्ये सहभागी करून घेण्यात आले. नदी स्वच्छता अभियानचे स्वच्छतादूत आदिनाथ ढाकणे यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना आदिनाथ ढाकणे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना आपण करत असलेल्या समाजोपयोगी कार्याचा लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी नदी स्वच्छता मोहीम, जलसंधारण, झाडे लावणे व संवर्धन करणे यामध्येही भरीव योगदान दिले. कोपरगाव येथील गोदावरी नदीपात्र ते मागील सलग २५० आठवडे स्वच्छ करत असून लोकांची नदी स्वच्छता ठेवण्याबद्दल मानसिकता तयार करत आहेत. मेगेसेसे पुरस्कार विजेते जगविख्यात जलतज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांचा राजस्थान येथील नदी पुनरुज्जीवन योजनेचा आदर्श घेऊन ते महाराष्ट्रातील नद्या स्वच्छ व पुनरुज्जीवित करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. या कामाची दाखल महाराष्ट्र शासनाने घेतली आहे. नदीला आपण आईचा दर्जा देतो, परंतु कृतीमध्ये आपण तिला आईचा दर्जा देत नाही, ही खंत शेवटी त्यांनी बोलून दाखवली. एनएसएसच्या माध्यमातून समाजसेवेची शपथ यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
या शिबिर प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, उपप्राचार्य डॉ. बबन चौरे, प्रा. दत्तप्रसाद पालवे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे डॉ. अरुण राख, प्रा. आनंद घोंगडे, डॉ. वैशाली आहेर, डॉ प्रशांत साळवे, डॉ.भगवान सांगळे, डॉ. अशोक डोळस, डॉ. अभिमन्यू ढोरमारे, प्रा. ब्रम्हानंद दराडे, डॉ.अजयकुमार पालवे, ग्रंथपाल डॉ. किरण गुलदगड, डॉ.अर्जुन केरकळ सहभागी झाले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०० सेवकांनी सहभाग नोंदविला. पाथर्डी येथील परीट नदीची यावेळी स्वच्छता करण्यात आली.
88581
10





