महाराष्ट्र
नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीला निघालेल्या कुटुंबाचा अपघाती मृत्यू;चिमुकली बचावली
By Admin
नववर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीला निघालेल्या कुटुंबाचा अपघाती मृत्यू;चिमुकली बचावली
साईबाबांच्या दर्शनाआधीच काळाचा घाला; कंटेनर-दुचाकीच्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू
भरधाव कंटेनर डोक्यावरून गेल्याने मृत्यू
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
भांडुपवरून शिर्डी येथे साईबाबांच्या ( Shirdi Saibaba ) दर्शनाला दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीसह तीन वर्षाच्या मुलीचा अपघात ( Two wheeler container accident ) झाला आहे. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार ( Husband and wife died on the spot ) झाले असून त्यांनी तीन वर्षाची मुलगी थोडक्यात बचावली आहे.
मुंबई नाशिक महामार्गावरील ( Mumbai Nashik Highway ) येवई नाका जणू मृत्यूचा सापळा बनला आहे. या नाक्यावर दिवसाआड भीषण अपघाताच्या संख्येत वाढ ( Increase in number of accidents ) असतानाच, भांडुपवरून शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला ( Shirdi Saibaba ) दुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीसह तीन वर्षाच्या मुलीचा अपघात झाला आहे.
पती-पत्नी जागीच ठार - पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला पती-पत्नी जागीच ठार झाले. मात्र, त्यांची तीन वर्षाची मुलगी अपघातातून बचावली आहे. या अपघातात पती व पत्नीच्या डोक्यावरूनच भारधाव कंटेनरचे चाक गेल्याने पती-पत्नीच्या डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा झाला होता. मनोज जोशी, (वय 34) मानसी जोशी (वय 34) असे भीषण अपघातात जागीच ठार झालेल्या पती-पत्नीचे नाव आहे.
भरधाव कंटेनर डोक्यावरून गेल्याने मृत्यू - नववर्षाच्या निमित्ताने जोशी पती-पत्नी त्यांच्या तीन वर्षाच्या मुलीला घेऊन आज सकाळच्या सुमारास दुचाकीवरून शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनाला मुंबई नाशिक महामार्गावरून निघाले होते. त्या सुमाराला येवई गावाच्या हद्दीत असलेल्या नाक्यावर मागून येणाऱ्या भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर काही क्षणातच भरधाव कंटेनर त्यांच्या डोक्यावरून गेल्याने डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. विशेष म्हणजे मृत पती-पत्नी सुरक्षित रित्या प्रवास व्हावा म्हणून डोक्यात हेल्मेटही घातले होते. मात्र त्या हेल्मेटचाही चक्काचूर होऊन पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला.
कंटेनर चालका विरोधात गुन्हा- अपघाताच्या घटनेची माहिती मिळतात, भिवंडी तालुका पोलीसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दोघांचेही मृतदेह भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात शविच्छेदनासाठी रवाना करून कंटेनर चालका विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या भीषण अपघाताच्या घटनेचा अधिक तपास भिवंडी तालुका पोलीस करीत आहेत.
Tags :
720865
10