राष्ट्रीय बाल स्वास्थ महाराष्ट्र शासन अंतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरी तालुक्यातील भारत सर्व सेवा संघ संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्यूनिअर काॕलेजमध्ये
राष्ट्रीय बाल स्वास्थ महाराष्ट्र शासन कार्यक्रम तालुका इगतपुरी अंतर्गत शालेय
विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॕ. श्रीमती एस.आर.सोनवणे,डाॕ.शिल्पा थोरात,डाॕ.पियुष वाघेरे यांनी
इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीत कान,नाक,डोळे,हात,पाय तसेच इतर शारीरिक अवयवाची तपासणी करत विद्यार्थ्यांना काही शारीरिक आजार तसेच मानसिक ञास होत आहे का? या संबंधी प्रत्येक विद्यार्थ्यांशी प्रश्न विचारले.तसेच काहीना आजारी असल्यास तालुका आरोग्य शिबीरात त्यावर इलाज केला जाईल.असे यावेळी डाॕ. वाघेरे यांनी यावेळी सांगितले.