अष्टवाडा तरुण मंडळाच्या आरसला पाथर्डीकारांचा उत्फुर्त प्रतिसाद
अष्टवाडा तरुण मंडळाचा गणेशोत्सव उत्साहात व पर्यावरण पूरक साजरा
पाथर्डी प्रतिनिधी:
अष्टवाडा मंडळाने ह्यावर्षी सामाजिक संदेश देत सोशल मिडिया 'दशा की दिशा' या ज्वलंत विषयावर जिवंत देखावा सादर केला. शहरातील अनेक गणेश मंडळाने व विविध स्तरावरून या देखाव्याला समर्थन केले गेले व शुभेच्छा दिल्या.
गेल्या अनेक वर्षापूर्वी अष्टवाडा तरुण मंडळाची आरास म्हंटल तर नागरिक लांब लांबून आरस पाहण्यासाठी येत असत, परंतु मागील काळात खंडित पडलेली आरसची प्रथा अष्टवाडा तरुण मंडळाने पुन्हा एकदा नव्याने सुरू केली आहे.प्रत्येक घरात युवा पिढी,लहान मुलं,मोठी माणसं हे सर्वच सोशल मीडियाच्या आहारी गेलेले चित्र समाजात दिसत आहे.त्यामुळे यावर जनजागृती करावी, म्हणून मंडळाने या विषयावर देखावा सादर केला होता.
या सोशल मीडियामध्ये गुगल, फेसबुक, व्हाट्सअप,इंस्टाग्राम यांचा उपयोग आपण कसा करतो, यावर आपल्या जीवनाची दिशा ठरते,नाहीतर यांचा उपयोग जर चुकीचा केला तर आपल्या आयुष्याची दशा होते, असा संदेश देण्याचा प्रयत्न अष्टवाडा तरुण मंडळाने केला.
देखावा पाहण्यासाठी पाथर्डीकारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी करत प्रतिसाद दिला.या देखाव्याची संकल्पना व लेखन आतिष नि-हाळी व दिग्दर्शन प्रतिक वराडे यांनी केले.
आकाश नि-हाळी,श्रावणकुमार अड्डानी, पायल असलकर,माणिनी वायळ,संस्कृती घोरतळे,ओंकार दगडखैर,अथर्व माळवे,प्रथमेश शिरसाट,विपुल नि-हाळी या मंडळाच्या कलाकारांनी आरसमध्ये सहभाग नोंदवला होता.
या वर्षीचा गणेशोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व अष्टवाडा तरुण मंडळाच्या सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.