महाराष्ट्र
महसूल गावांच्या रब्बी पिकांची नजर आणेवारी 75 पैसे
By Admin
महसूल गावांच्या रब्बी पिकांची नजर आणेवारी 75 पैसे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सततच्या ढगाळ हवामानाने रब्बीची पिके धोक्यात आली आहेत. तरीही 79 महसूल गावांच्या रब्बी पिकांची नजर आणेवारी 75 पैसे लावण्यात आली आहे.
प्रशासनाने आणेवारी जाहीर करताना कागदात मेळ घालण्यापेक्षा प्रत्यक्षात शेतातील पीक पाहणी करावी. त्यानंतरच आणेवारी जाहीर करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. तालुक्यातील 34 खरीप महसुली गावांच्या पिकांची अंतिम आणेवारी 50 पैशांपेक्षा कमी जाहीर झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळालेला आहे. तालुक्यात खरिपापेक्षा रब्बीची गावे जास्त आहेत. खरीप पिकांची परिस्थिती पाहता त्यापेक्षा रब्बी पिकांची दारूण अवस्था होत असल्याचे चित्र आहे.
या पिकांच्या पोषण वाढीस हिवाळा ऋतू महत्त्वाचा असतो. जास्त थंडी असल्यास ही पिके जोमदार येतात, असा शेतकर्यांचा विश्वास आहे. मात्र, यंदाचा हिवाळा दूषित असल्यागत झाला आहे. या ऋतूत कधी ऊन, तर कधी ढगाळ हवामान, असा सतत वातावरणात बदल होत असल्याने पिकांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. हवामान बदलाने रोगांचा वाढता प्रादुर्भाव पाहता गहू, ज्वारी, हरभरा पिकांची वाढ खुंटली आहे. पिकांचा जोम कमी झाल्याने उत्पन्नात त्याची खोट होणार आहे. याचा सारासार विचार करता, प्रशासनाने आणेवारी जाहीर करताना प्रत्यक्षात शिवार फेरी करून निर्णय घेतल्यास पिकांची खरी परिस्थिती समोर येईल. त्यामुळे शेतकर्यावर अन्याय करताना कितपत करावा, या विचाराने कदाचित दया आलीच, तर आणेवारी जाहीर करताना हात आखडता होऊ शकतो, अशाच अपेक्षा व्यक्त होत आहेत.
तालुकानिहाय आणेवारी
तालुक्यातील शेवगाव, एरंडगाव, बोधेगाव, चापडगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव मंडळांतील 79 महसूल रब्बी गावची सन 2022-23 ची नजर आणेवारी पुढीलप्रमाणे ः बक्तरपूर 72 पैसे , कुरुडगाव, रावतळे, भायगाव, मजलेशहर, अंत्रे, देवळाणे 73 पैसे, शेवगाव, खरडगाव, मुर्शतपूर, तळणी, गदेवाडी, दहिगाव शे, विजयपूर, सोनविहीर, देवटाकळी, शहरटाकळी, ढोरसडे, सुलतानपूर बुद्रुक, घेवरी, रांजणी, जोहरापूर, खामगाव, मलकापूर, गरडवाडी, आपेगाव, आखतवाडे, मळेगाव-ने, लोळेगाव, वडुले बुद्रुक, आव्हाने खुर्द, शहापूर, आव्हाणे बुद्रुक, बर्हाणपूर, निंबेनांदूर, नांदूर विहीरे 74 पैसे, अमरापूर, आखेगाव ति, डोंगर आखेगाव, भगूर, खुंटेफळ, दादेगाव, घोटण, आंतरवाली खुर्द, ने, खानापूर, कर्हेटाकळी, बालमटाकळी, चापडगाव, खडके, ठाकूर पिंपळगाव, भातकुडगाव, भावी निमगाव, दहिगाव-ने, हिंगणगाव-ने, ढोरजळगाव शे, ढोरजळगाव-ने, सामनगाव, वाघोली, वडुले खुर्दऔ 75 पैसे, सुलतानपुर खुर्द, शहाजापूर, वरुर बु, वरुर खुर्द, एरंडगाव, लाखेफळ, ताजनापूर, बोडखे, हातगाव, पिंगेवाडी, प्रभूवाडगाव, मडके, लखमापुरी, मुंगी 76 पैसे, दहिफळ, ढोर हिंगणी, कर्जत खुर्द, कांबी, गायकवाड.जळगाव, खामपिंप्री 77 पैसे
Tags :
81172
10