सतिश गुगळे यांची गौतम लब्धी फांऊडेशनच्या राज्य कार्यकारिणी सदस्यपदी निवड
गुरु आनंद संगीत मंडळाच्या वतीने यथोचीत सन्मान
पाथर्डी प्रतिनिधी:
अर्हम विज्जा प्रणेता,उपाध्याय प्रवर, प. पू. प्रवीणऋषीजी म. सा. यांच्या संकल्पनेतून गौतम लब्धी फाऊंडेशनची निर्मिती झालेली आहे. या फाऊंडेशनच्या माध्यमातून समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला शिक्षण, वैद्यकीय, व्यवसाय इ.साठी योग्य ती मदत दिली जाते. त्याला सक्षमपणे उभे केले जाते. शिवाय याचा कोणताही बडेजाव केला जात नाही. ही मदत पूर्णतः निस्वार्थ भावनेने केली जाते व मदत स्विकारण्याचाही स्वाभिमान जपला जातो. अशाप्रकारचे हे कार्य या फाऊंडेशनच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर सुरु आहे. या फाऊंडेशनच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारीणी सदस्यपदी श्री तिलोक जैन ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव तथा गुरु आनंद संगीत मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक सतिश गुगळे यांची नुकतीच निवड करण्यात आली. याबद्दल गुरु आनंद संगीत मंडळाच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी त्यांना संगीत मंडळाकडून विशेष सन्मानपत्र देण्यात आले.
या वेळी शाहीर भारत गाडेकर, सुनिल गुगळे, चंदन कुचेरीया,राजेंद्र चव्हाण, सुनिल कटारिया, बिपिन खंडागळे, संजय राजगुरू, सचिन साळवे, विशाल निकम, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाहीर भारत गाडेकर यांनी केले तर सन्मानपत्राचे वाचन सुनिल कटारिया यांनी केले. आभार बिपीन खंडागळे यांनी मानले.