महाराष्ट्र
89041
10
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळसदृश्य परिस्थिती
By Admin
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या १०२१ महसुली मंडळांपैकी विभाजन झालेल्या नवीन महसुल मंडळांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील तीसगाव अकोला, खरवंडी चा समावेश
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक: एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७ मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२. दिनांक : १६ फेब्रुवारी, २०२४.
नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे, यासाठी अशा प्रस्तावांवर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उपसमिती वर नमूद क्र.२ येथील दि.१३ जून, २०१८ च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आली आहे. सदर मंत्रीमंडळ उपसमितीस वर नमूद क्र.२ येथील दि.५ डिसेंबर, २०१८ च्या शासन निर्णयान्वये सन २०१८ च्या दुष्काळी कालावधीसह भविष्यात दुष्काळ उद्भवल्यास, त्या दुष्काळी कालावधीकरिता तातडीने उपाययोजना सुचविण्यासाठी/सनियंत्रण ठेवण्यासाठी/निर्णय घेण्यासाठी पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. वर नमूद क्र.२ येथील दि.७ नोव्हेंबर, २०२३ च्या शासन निर्णयानुसार या मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. दुष्काळ व्यवस्थापन संहिता, २०१६ मधील तरतुदी व निकष विचारात घेवून वर नमूद क्रमांक ३ येथील दि.३१ ऑक्टोबर, २०२३ च्या शासन निर्णयान्वये राज्यातील ४० तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे. या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि.०९ नोव्हेंबर, २०२३ रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरून वर नमूद दि.१० नोव्हेंबर, २०२३ च्या
शासन निर्णय क्रमांकः एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७
शासन निर्णयाद्वारे राज्यातील कमी पर्जन्यमान झालेल्या १०२१ महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्यात आल्या आहेत. मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि.०२ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या बैठकीत, खरीप हंगाम २०२३ करिता दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहिर केलेल्या १०२१ मंडळांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळ स्थापन करण्यात आले आहे आणि त्या महसूली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेले नाही अशी नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून जाहिर करण्यात यावीत, असा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यास अनुसरून सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तसेच जिल्हाधिकारी, लातूर यांच्या वर नमूद दि.०६ फेब्रुवारी, २०२४ च्या पत्राव्दारे प्रस्तावास अनुसरुन शासन आदेश निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती.
शासन निर्णयः
राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांव्यतिरिक्त इतर तालुक्यांमधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर, २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५% पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले आहे अशा वर नमूद दि.१० नोव्हेंबर, २०२३ च्या शासन निर्णया सोबतच्या परिशिष्ट "अ" येथे नमूद केलेल्या एकूण १०२१ महसुली मंडळांपैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसूली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी, लातूर यांच्या प्रस्तावामधील या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये दर्शविलेली २२४ नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित करून या महसुली मंडळांकरिता खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
१) जमीन महसूलात सूट.
२) सहकारी कर्जाचे पुनर्गठन.
३) शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती.
४) कृषी पंपाच्या चालू विजबिलात ३३.५% सूट.
५) शालेय / महाविद्यालयीन विद्यार्थ्याच्या परिक्षा शुल्कात माफी. ६) रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता.
७) आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर.
८) टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे.
२. या आदेशान्वये देण्यात येणा-या विविध सवलतीपोटीचा आर्थिक भार संबंधित प्रशासकीय विभागांनी उचलावा व त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. यानुषंगाने प्रशासनिक विभागांनी त्यांच्या अधिपत्याखालील सर्व क्षेत्रिय यंत्रणांकरिता आवश्यक ते पूरक आदेश निर्गमित करावेत. त्यानुसार या प्रकरणी पुढील उचित कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अनुपालन अहवाल या विभागास सादर करण्यात यावा.
३. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना सोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये नमूद केलेल्या २२४ महसुली मंडळामध्ये उपरोक्त उपाययोजना अंमलात आणण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे. त्यांनी तातडीने सदर उपाययोजना अंमलात आणाव्यात. सोबतच्या परिशिष्ट "अ" मध्ये नमूद नागलगाव
शासन निर्णय क्रमांकः एससीवाय-२०२३/प्र.क्र.३७/म-७
मोघा वगळून उर्वरित महसूली मंडळांपैकी ज्या नवनिर्मित महसूली मंडळामध्ये पर्जन्यमापक यंत्र (AWS) बसविण्यात आलेले असेल आणि ते महसूली मंडळ मंत्रिमंडळ उपसमितीच्या दि.०९ नोव्हेंबर, २०२३ च्या बैठकीतील निर्णयानुसार पर्जन्यमानाचे निकष पूर्ण करित नसेल त्यांच्याकरिता हे आदेश लागू होणार नाहीत.
४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२४०२१६१५१४५६९२१९ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावांने,
महाराष्ट्रातील जिल्ह्यातील तालुकानिहाय यादी
अहमदनगर-
अकोले खिरवरे, लिंगदेव, वाकी, रूभोडी
पाथर्डी
अकोला, खरवंडी, तिसगांव
राहुरी
बारागाव नांदुर
नगर
नेप्ती
कर्जत
कोरेगांव, खेड, कुळधरण, वालवड
संगमनेर
नांदुरखंदरमाळ, संगमनेर खु., निमोण, घुलेवाडी
जामखेड
शेवगांव
श्रीगोंदा
पारनेर
अहमदनगर
नेवासा
साकत, पाटोदा
मुंगी, दहिगांव ने
भानगांव, अढळगांव, लोणी व्यंकनाथ
कान्हूर पठार, पळवे खु., जवळा, अळकुटी
भानसहिवरे, प्रवरासंगम, देडगांव
राहता
अस्तागांव
श्रीरामपूर
कोरेगांव
कोपरगांव
कोकमठाण
SANJAY AUDUMBAR DHARURKAR
Tags :
89041
10





