कृषी अधिकारी,कर्मचारी,बोगस लाभाथ्र्यांवर कारवाई करावी
By Admin
कृषी अधिकारी,कर्मचारी,बोगस लाभाथ्र्यांवर कारवाई करावी
नगर सिटीझन live team-
बोगस लाभार्थींशी संगनमत करुन मौजे पिंपरखेड (हसनाबाद तालुका जामखेड) येथे जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी शेततळे, कांदा चाळ, फळबाग यांची कामे न करता मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप करुन सबंधितांवर गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी बापूसाहेब शिंदे या शेतकर्याने जिल्हाधिकारी कार्यालया जवळील भूजल सर्व्हेक्षण कार्याल याच्या आवारात अमरण उपोषण केले. मौजे पिंपरखेड (हसनाबाद तालुका जामखेड) येथे २०१७-१८ व २०१८-१९ या काळात जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी संगनमत करून शेततळे, कांदाचाळ, फळबाग यांची कामे न करताच कागदोपत्री झाल्याचे बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपयांची अफरातफर केली आहे.या कामामध्ये मोठ्या प्रमाणात निधी हडप करण्यात आला असून, सदर प्रकार जन माहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी यांनी माहिती अधिकार अर्जाद्वारे मागितलेल्या माहितीवरुन ८ जानेवारी २०२१ रोजी उघडकीस आला आहे.या भागातील शेततळे,कांदा चाळ,फळबाग यांची कामे प्रत्यक्षात न करता कागदोपत्री दाखवण्यात आले असल्याचा बापूसाहेब शिंदे यांचा आरोप आहे.तालुका कृषी अधिकारी,उपविभागीय कृषी अधिकारी यांच्याकडे
लेखी तक्रार करुन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही.जिल्हाधिकारी यांनी या भागाची प्रत्यक्ष पाहणी करुन बनावट दस्तऐवज तयार करून लाखो रुपयांची अफरातफर करणार्या जामखेड तालुका कृषी कार्यालयातील संबंधित अधिकारी, कर्मचारी व बोगस लाभार्थींवार गुन्हे दाखल करुन कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली.कृषी उपसंचालक विलास नलगे यांनी सोमवार २२ मार्च पासून तक्रारीची तपासणी सुरु करुन त्याचा अहवाल दि.५ एप्रिल पर्यंत सादर करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने उपोषणकर्ते शिंदे यांनी आपले उपोषण संध्याकाळी उशीरा जामखेड पंचायत समितीचे सभाप ती सुर्यकांत मोरे यांच्या उपस्थितीत मागे घेतले.