महाराष्ट्र
10958
10
550 कोटी निधीची तरतूद; उपमुख्यमंत्र्यांचे माजी आ. कोल्हेंनी मानले आभार
By Admin
550 कोटी निधीची तरतूद; उपमुख्यमंत्र्यांचे माजी आ. कोल्हेंनी मानले आभार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील शिर्डी विमानतळावर नवे सुसज्ज प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी 527 कोटी तर मतदारसंघातील विविध ठिकाणच्या रस्त्यांच्या कामांसाठी 25.50 कोटी अशा एकूण साडेपाचशे कोटी रुपयांहून अधिक निधीची तरतूद केली आहे.
याबद्दल भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदारसंघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कार्यक्रमांसाठी कर्जत (जि. अहमदनगर) दौर्यावर आले होते. याप्रसंगी कोल्हे यांनी फडणवीस यांचे स्वागत केले. तसेच निधीची तरतूद केल्याबद्दल त्यांचा सत्कार केला. या अर्थसंकल्पात कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विविध रस्त्यांसाठी 25.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
तसेच चास-वडगाव-बक्तरपूर जिल्हा हद्द रस्ता, कोपरगाव ते धारणगाव, धामोरी, येसगाव, येसगाव-खिर्डी गणेश-बोलकी रस्ता सुधारणा करणे, बक्तरपूर जिल्हा हद्द , अंजनापूर ते रांजणगाव देशमुख, उक्कडगाव, शिंगवे ते बनकर वस्ती रस्ता सुधारणा आदी रस्त्यांचासाठी 25.50 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे.
निधीतून आता मतदारसंघातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार असल्याने गेल्या काही वर्षांपासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. हवाई वाहतुकीला प्रोत्साहन व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.
शिर्डी हे जागतिक दर्जाचे तीर्थस्थळ असून, या ठिकाणी दररोज देश-विदेशातून असंख्य साईभक्त येत असतात. शिर्डीला येणार्या भाविकांच्या सोयीसाठी कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यात आलेले असून, या विमानतळावर नवीन अद्ययावत प्रवासी टर्मिनल उभारण्यासाठी 527 कोटीचा निधी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी कोपरगाव मतदारसंघाला ही अनोखी भेट दिली असल्याचे स्नेहलताताई कोल्हे यांनी सांगितले.
Tags :
10958
10





