महाराष्ट्र
10710
10
शेवगांव तालुक्यातील हासनापूर येथे गौण खनिज कारवाईसाठी
By Admin
शेवगांव तालुक्यातील हासनापूर येथे गौण खनिज कारवाईसाठी गेलेल्या शेवगावच्या नायब तहसीलदारासह कारकूनावर जीवघेणा हल्ला;पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल
शेवगाव- प्रतिनिधी
अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना, हसनापुर ( ता.शेवगाव ) शिवारात रविवारी रात्री घडली आहे. या घटनेत परिविक्षाधीन नायब तहसीलदार राहुल गुरव व रवींद्र सानप कारकून असे पथकातील दोघे जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून उर्वरित तीन आरोपी फरार झाले आहेत. याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात नायब तहसीलदार राहुल पोपट गुरव यांनी फिर्याद दिली असून विठ्ठल लक्ष्मण ढाकणे, अंगद अर्जुन ढाकणे, अनिकेत अर्जुन ढाकणे, अर्जुन विष्णू ढाकणे या चौघांच्या विरोधात, जिवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा आणणे तसेच विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नायब तहसीलदार राहुल गुरव यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, *मी व अव्वल कारकून रवींद्र सानप, तलाठी सचिन सुरेश लोहकरे, सोमनाथ प्रकाश आमने, हे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाईसाठी गेले हतो. यावेळी गौण खनिज वाहतूक करणारा ट्रॅक्टर आढळून आला. त्यास थांबविले असता ट्रॅक्टर वरील चालक तेथून पळून गेला. त्यानंतर तिथे बुलेट ( क्र. एमएच १७ बिके ८६१८) या गाडीवर अर्जुन विष्णू ढाकणे, अनिकेत अर्जुन ढाकणे हे दोघे तिथे आले. यावेळी त्यांनी उर्मट भाषेत तुम्ही कोण असे विचारले असता आम्ही आमचा परिचय दिला.यावेळी त्यांनी तुमच्या सारखे पुष्कळ अधिकारी बघितले आहेत. आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही तहसील कार्यालयात ट्रॅक्टर नेणार नाहीत. त्याच वेळी विठ्ठल ढाकणे, अंगद ढाकणे हे मोटर सायकल वरुन काठ्या व लोखंडी गज घेऊन तिथे आले. आम्हाला शिवीगाळ करु लागले.यावेळी विठ्ठल ढाकणे ट्रॅक्टर वर बसून ट्रॅक्टर पळून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना आम्ही त्यास अडविण्याचा प्रयत्न केल्याचा राग येऊन आम्हाला मारहाण करण्यास सुरुवात केली.आता यांना जिवे मारुन टाकतो असे म्हणत विठ्ठल ढाकणे याने दगडी पाटा जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात फेकून मारला असता यावेळी माझे सहकारी सचिन लोहकरे यांनी बाजूला ओढल्याने तो माझ्या डाव्या हाताला लागल्याचे फिर्यादी मध्ये म्हटले आहे. याप्रकरणी मुख्य आरोपी अर्जुन ढाकणे यास शेवगाव पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे* तर उर्वरित आरोपी फरार झाले आहेत. या घटनेनंतर शेवगाव तालुका तलाठी संघटना व शेवगाव महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे व जोपर्यंत संबंधित आरोपी अटक होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन चालू राहील असा इशारा तलाठी संघटना व शेवगाव महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी एम.एस.बेळगे,श्रीमती शिंदे एस.इ, श्रीमती कचरे आर.बी, नायमणे व्ही.पी,श्री संतोष एस.गर्जे,श्री.शिंदे एस.जी,श्रीमती ससाने जे.एस, श्री.हुलमुखे जी.एस,श्री व्ही.एस गायकवाड, श्रीमती ए.आर गर्जे,श्री. एम.व्ही दराडे व इतर कर्मचारी उपस्थित होते. या घटनेनंतर तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केल्याने अनेक विद्यार्थ्यांचे तसेच शेतकऱ्यांची कामे रखडली आहेत.
शेवगांव तालुक्यात काही भागात बिनबोभाट गौण खनिज उत्खनन सुरु असुन त्यास सुद्धा पायबंद बसने गरजेचे आहे शेवगांव तालुक्यात वारंवार महसुल पथकावर हल्ले करण्याची हिम्मत येते कुठुन??? यां वाळु चोरांना आणि मुरूम चोरांना आशिर्वाद कोणछा आहे याचा शोध महसुल आणि पोलीस यंत्रणेने संयुक्त रित्या घेऊन त्यांचे कंबरडे मोडले पाहिजे यापूर्वी पोलीस तलाठी तहसील चे कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर वारंवार हल्ले झाले आहेत हि मालिका थांबणं गरजेचे आहे
Tags :
10710
10





