शेवगाव- पोलिस लाचेच्या जाळ्यात; गुन्हा दाखल करण्यासाठी पैशाची मागणी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
गुन्हा दाखल करण्यासाठी लाचेची मागणी करणार्या शेवगाव पोलिस ठाण्याच्या पोलिस नाईकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष काकडे असे लाचेची मागणी करणार्या पोलिस नाईकाचे नाव आहे.
शेवगाव पोलिस ठाण्यात अपघाताची फिर्याद देण्यासाठी तक्रारदार आले होते.
त्यांच्या वडिलांच्या अपघातातील वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी 20 हजार रुपयांची लाच पोलिस नाईक काकडे याने मागितली होती. 14 जानेवारीला लाच स्विकारण्याचे आरोपी पोलिसाने मान्य केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात आरोपी पोलिस नाईक दोषी आढळल्याने शेवगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास नाशिक लाचलुचपत विभागाच्या पोलिस निरीक्षक साधना ईंगळे करीत आहेत.