महाराष्ट्र
25200
10
चितळी शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड
By Admin
चितळी शाळेच्या विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरासाठी निवड
पाथर्डी- प्रतिनिधी
नुकत्याच संपन्न झालेल्या पाथर्डी तालुकास्तरीय विविध गुणदर्शन स्पर्धेमध्ये चितळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले. वेशभूषा सादरीकरण स्पर्धेमध्ये कु.अंकिता नानासाहेब गिरी ( किशोर गट) हिने तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरासाठी बाजी मारली.तसेच तिने हस्ताक्षर स्पर्धेमध्ये देखील तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला. सांस्कृतिक कार्यक्रम ( मोठा गट) यामध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राची लोकधारा, लोकपरंपरा व लोकसंस्कृती यावर सुंदर नृत्य करत तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला आणि जिल्हास्तरासाठी आपले स्थान पक्के केले. यामध्ये प्रियंका कोठुळे ,लक्ष्मी देशमाने ,अंकिता गिरी ,भक्ती देशमाने ,भक्ती आमटे, उत्कर्षा दोरगे, आरती कोठुळे ,अवनी साळवे, श्वेता गिरी, कार्तिकी पवार, कार्तिकी बळीद, आयुष शेरकर, सोहम ढमाळ ,विश्वजीत जाधव ,अथर्व आमटे, सार्थक ढमाळ,समर्थ कोठुळे, अभिषेक वाबळे या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. शिवराज साळवे याने ढोलकी वाजवली तर सचिन शेरकर यांनी पेटीवादन केले.
वेशभूषा सादरीकरण स्पर्धेमध्ये कु.प्रियंका अशोक कोठुळे (कुमार गट )हिने तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. तसेच वैयक्तिक गीतगायन स्पर्धेमध्ये आयुष सचिन शेरकर याने तालुक्यात तृतीय क्रमांक मिळविला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे गटशिक्षणाधिकारी अनिल भवार, शिक्षण विस्ताराधिकारी लहू भांगरे,केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव ,सरपंच अशोक आमटे,उपसरपंच आजिनाथ आमटे, ग्रा.सदस्य बाबासाहेब आमटे ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक कोठुळे, उपाध्यक्ष दादासाहेब ढमाळ , कविवर्य बाळासाहेब कोठुळे आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका संगिता बर्डे,कैलास सदामत,मेहताब लदाफ, महादेव कौसे, अनुपमा जाधव ,सविता राजपूत ,राधिका खटावकर,सोनाली ससाणे यांचे मार्गदर्शन लाभले.
Tags :
25200
10





