कवडदरा विद्यालयात ७५ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
नाशिक - प्रतिनिधी
इगतपुरि तालुक्यातील कवडदरा येथील भारत सर्व सेवा संघ शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॕलेज कवडदरा विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला.
यावेळी गावातून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.यामध्ये ढोल-ताश्याच्या गजरात लेझीम पथकासह विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिन विशेष भारत माता कि जय,जय जवान जय किसान,वंदे मातरम अशा घोषणा दिल्या.तसेच
यावेळी विद्यालयात ध्वजारोहण मा. श्री. धनुभाऊ रोंगटे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
यावेळी क्रिडा विभागातील तालुकास्तरीय,जिल्ह्या स्तरीय,विभाग स्तरीय,राज्य स्तरीय स्पर्धेत नेञदिपक यश मिळवणा-या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विज्ञान प्रदर्शनातील उत्कृष्ट उपकरण बनवून जिल्ह्यात व्दितीय क्रमांक मिळवणा-या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते युवा ध्येय पुरस्कार टाॕफी,फुल,शाल देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम विविध नृत्य व नाटिका कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे सादर केला.
यावेळी विद्यालयाचे प्राचार्य व्हि.एम.कांबळे तसेच गावातील सरपंच सौ.अश्विनी भोईर,उप सरपंच,ग्राम पंचायत सदस्य,पोलिस पाटील,प्रतिष्ठित व्यक्ती,
अंगणवाडी सेविका,आरोग्य सेविका,भारतातील सैन्य दलातील सैनिक,माजी विद्यार्थी,ज्येष्ठ नागरिक, पुरुष व महिला ग्रामस्थ, विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.