समृद्धी महामार्गावर अपघात; तीन ठार
By Admin
समृद्धी महामार्गावर अपघात; तीन ठार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची मालिका सुरूच आहे. कोपरगाव तालुक्यातील धोत्रे शिवारात नुकताच एक भीषण अपघात झाला. या अपघातात स्विफ्ट कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले, अशी माहिती पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी दिली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात मवत झालेले राहुल श्रीमंत राजभोज (वय ३५, रा. निमखेडा, ता. जाफराबाद), उमेश दामोदर उगले (वय २८, रा. भातोडी, ता. जाफराबाद), भाऊसाहेच नामदेव पैठणे (वय ३५, रा. दहेगाव, ता. जाफराबाद) हे सर्वजण जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील रहिवासी आहेत. हे सर्वजण शुक्रवारी (दि.९) रात्री जाफराबाद, जालना
येथून एमएच २१ बीएफ ९२४८ क्रमांकाच्या स्विष्ट कारने शिडर्डीकडे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील धोत्रे येथे
३३, रा. तपोवन) आणि नरेंद्र मनसुखलाल वाघ (वय ५५, रा. टेंभुर्णी, तपोवन) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्वजण जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील रहिवासी आहेत.
शिवारात स्विफ्ट कारने एमएच ४६ एएफ ९८३३ क्रमांकाच्या कंटेनरला मागून जोरदार धडक दिल्याने कारचे छत उडून गेले. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तर शिवहरी पांडुरंग फलके (वय
घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांसह कोपरगाव तालुका पोलीस व नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना वैजापूर येथे उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी
हॉस्पिटल
रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृत्यू झालेल्या तिघांचे मृतदेह कोपरगाव
ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. याबावत दत्तात्रय रामदास सवडे (वय ३६, रा. नांदखेडा, ता. जाफराबाद, जि. जालना) यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात
दिलेल्या फिर्यादीवरून मयत स्विफ्ट कारचालक उमेश दामोदर उगले (वय २८, रा. टेंभुर्णी, ता. जाफराबाद, जि. जालना) याच्या विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
81555
10





