पाथर्डीत विघ्नहर्ता गणपती मंदिराचा जीर्णोद्धार उत्साहात
पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी शहरातील सामाजिक क्षेत्रातील अग्रेसर असणारे अष्टवाडा तरुण मंडळाच्या वतीने अष्टवाडा विभागामध्ये श्री विघ्नहर्ता गणपती मंदिर जीर्णोद्धार व मूर्ती प्राणप्रतिष्ठा हा तीन दिवसीय सोहळा पार पडला.
या निमित्ताने दि. १० रोजी पाथर्डी शहरात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली.त्यामध्ये पाथर्डी मधील प्रसिद्ध रामराज्य ढोल पथक हे मुख्य आकर्षण होते तर पायल भारती असलकर हिने झाशीची राणी हे लाठी- काठी चे प्रात्यक्षिक सादर करत महिलांना स्वरक्षणाचे धडे दिले. अष्टवाडा परिसरातील महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावत मिरवणुकीची शोभा वाढवली.
शुक्रवारी शंकर महाराज मठाचे मठाधिपती माधवबाबा यांच्या शुभहस्ते गणेश मूर्ती ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. या वेळी महापूजेचा अनिल तरवडे ,अक्षय वराडे,प्रसाद नि-हाळी,महादेव मेघुंडे,अमर पारखे यांना मिळाला.तसेच प्राणप्रतिष्ठा नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम घेण्यात आला.महाप्रसादाचे यजमान मा. नगराध्यक्ष अभय आव्हाड व मा. नगरसेवक नंदकुमार शेळके हे होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आतिष नि-हाळी,ओम भालसिंग, संतोष वराडे,सतिष बडदे,विशाल नि-हाळी,सतिष राठी,संतोष कुलट,प्रतीक वराडे,आकाश भातोडे,प्रताप नि-हाळी,कुणाल खोजे,आकाश नि-हाळी,प्रतीक पारेकर,आशिष कोष्टी,प्रतीक मनेळ,सिध्दराज खोजे,ओम बडदे,सुशांत मनेळ, श्रेयस बडदे, सर्व अष्टवाडा तरुण मंडळ व महिला मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.