महाराष्ट्र
महिला सरपंचसह लिपिक 20 हजार रुपये लाच स्वीकारतानाअॕन्टी करप्शनच्या जाळ्यात
By Admin
महिला सरपंचसह लिपिक 20 हजार रुपये लाच स्वीकारतानाअॕन्टी करप्शनच्या जाळ्यात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
ग्रामपंचायतने राखून ठेवलेल्या जीएसटीच्या रकमेचा चेक देण्यासाठी 20 हजार रुपये लाच स्वीकारताना (Accepting Bribe) नगर तालुक्यातील निंबळक ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचासह लिपिकाला अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Ahmednagar ACB Trap) सापळा रचून रंगेहात पकडले.
कारवाई मंगळवारी (दि.10) निंबळक ग्रामपंचायत कार्यालयासमोर (Nimblak Gram Panchayat) करण्यात आली. अहमदनगर एसीबीच्या पथकाने (Ahmednagar ACB Trap) केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
सरपंच प्रियांका अजय लामखडे Sarpanch Priyanka Ajay Lamkhade (वय-35), ग्रामपंचायत लिपिक दत्ता वसंत धावडे Clerk Datta Vasant Dhavade (वय 40) असे लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत सोनेवाडी येथील 30 वर्षीय ठेकेदाराने (Contractor) अहमदनगर एसीबीकडे (Ahmednagar ACB Trap) मंगळवारी तक्रार केली.
तक्रारदार हे कंत्राटदार असून, त्यांनी निंबळक गावातील निंबळक - लिंगतीर्थ रस्त्याचे मजबुती करण्याच्या कामाचा ठेका जिल्हा परिषद अहमदनगर (Zilla Parishad Ahmednagar) कडुन घेतला होता. त्यांनी या रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करुन केलेल्या कामाचे 13 लाख 65 हजार 056 रुपयांचे बील मंजुरीसाठी जिल्हा परिषद मध्ये सादर केले होते. हे बिल मंजूर होऊन ग्रामपंचायत निंबळक यांचे बॅंक खात्यामध्ये जमा झाले होते. तक्रारदार यांना 12 लाख 38 हजार 556 रुपयांचा चेक सरपंच व ग्रामसेवक यांचे सहीचा मिळाला होता. त्यावेळी सरपंच प्रियांका लामखडे यांनी तक्रारदार यांचेकडून पैसे घेतल्यानंतर चेकवर सही केली होती.
तक्रारदार यांच्या बिलातील 1 लाख 26 हजार रुपये जी एस टी (GST) पोटी ग्रामपंचायतने राखून ठेवली होती. तक्रारदार यांनी जी एस टी पुर्तता करुन ग्रामपंचायत निंबळक च्या ग्रामसेविका यांचेकडे चेकची मागणी केली, ग्रामसेविका यांनी चेक वर सही करुन चेक तयार ठेवला होता. परंतु या चेकवर सही करण्यासाठी सरपंच प्रियांका लामखडे यांनी तक्रारदार यांचेकडे 20 हजार रुपयाची मागणी केली. तक्रारदार यांनी याबाबत अहमदनगर एसीबीकडे मंगळवारी तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने मंगळवारी निंबळक येथे लाच पडताळणी केली असता आरोपी सरपंच लामखडे आणि लिपिक दत्ता धावडे यांनी तक्रारदार यांचे कडे वीस हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच प्रियांका लामखडे यांनी लाचेची रक्कम लिपिक दत्ता धावडे यांच्याकडे देण्यास सांगितले.
रक्कम मिळाले नंतरच तक्रारदार यांचे बिलाचे चेक वर सही करेन असे लामखडे यांनी सांगितले.
त्यावरून मंगळवारी निंबळक ग्रामपंचायत समोर लाचेचा सापळा रचला.
दत्ता धावडे यांनी तक्रारदार यांचे कडुन 20 हजार रुपये लाच स्विकारली.
लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) दोघांवर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.
कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर (SP Sharmistha Gharge-Walawalkar),
अपर पोलीस अधीक्षक नारायण न्याहळदे (Addl SP Narayan Nyahalde)
पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार (DySP Narendra Pawar)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक हरीष खेडकर (DySP Harish Khedkar),
पोलीस निरीक्षक गहिनीनाथ गमे (Police Inspector Gahininath Game), पोलीस हवालदार संतोष शिंदे,
विजय गंगुल, पोलीस अंमलदार, वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, महिला पोलीस नाईक संध्या म्हस्के,
राधा खेमनर चालक हारून शेख, तागड यांच्या पथकाने केली.
Tags :
477775
10