महाराष्ट्र
10128
10
बनावट माणसांनी १६ गुंठे प्लाॕट परस्पर विकला;
By Admin
बनावट माणसांनी १६ गुंठे प्लाॕट परस्पर विकला;मृत्यू झालेल्या माणसाच्या जागेवर बनावट व्यक्ती केली उभी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
कल्याणरोड वरील मेवाडानगरचा हायवे टच प्लॉट मृत्यू झालेल्या माणसाच्या जागेवर बनावट व्यक्ती केली उभी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
नगरमध्ये बनावट माणसे उभी करून खरेदी विक्रीचे प्रकार घडत आहे त्यात आता अजून एक प्रकरणी एफआयआर कोतवाली पोलिसात दाखल झाला आहे विकणारा बनावट व जागा मालकाचे बनावट कागदपत्रे,बँक खाते,आधारकार्ड तयार करून हा प्लॉट विकण्यात आला आहे . कल्याण रोडवरील मेवाडानगरचा हायवे टच प्लॉट असून आज या संधर्भात रामेश्वर बालुराम कलवार यांनी तक्रार दिली आहे पोलिसांनी तपासास सुरुवात केली आहे.
एफआयआर मध्ये म्हटले आहे कि मी रामेश्वर बालुराम कलवार, वय 62 वर्षे, धंदा - व्यापार, मु.
रा. सोसर सदन,चैतन्य नगर, प्रोफेसर कॉलनी,सावेडी, अहमदनगर.ह.रा. सी/102, स्काय बेलवे डिअर, एअरपोर्ट रोड, विमान नगर, पुणे मो. 94222225112.मी पुणे येथील पत्त्यावर पत्नी व दोन मुले यांचे सोबत राहवयास आहे. तसेच मी अहमदनगर येथील पत्त्यावर देखील जावुन येवुन राहत असतो. माझे प्लॉटची बनावट खरेदीखताने परस्पर विक्री करुन माझी फसवणुक केली असल्याने खालील प्रमाणे लिहुन देत आहे.
मौजे नालेगांव, अहमदनगर येथे स.नं. 17/4 मधील प्लॉट न 01 चे क्षेत्र 1584.00 चौ.मी. हा प्लॉट माझे वडील बालुराम रघुनाथ कलवार यांनी सन 1997 मध्ये खरेदीखत दस्त क्र 3474/1997 मध्ये प्रविणकुमार पोपटलाल कटारीया यांचेकडुन खरेदीखताने खरेदी केला होता व 7/12 उताऱ्यावर माझे वडीलांचे नाव होते. माझे वडील हयात असतांना त्यांनी त्यांचे इच्छेनुसार सदर प्लॉट मिळकत ही मृत्युपत्र दस्त क्र 6027/2009 अन्वये दि.18/12/2009 मध्ये माझे नावे लिहुन ठेवले होते.
माझे वडील बालुराम कलवार हे दि 26/05/2019 रोजी राजस्थान येथे मयत झाले असुन त्याचे मृत्युची नोंद 19/06/2019 रोजी भिलवाडा, राजस्थान येथे झालेली आहे.
वडील मयत झाले नंतर सदरचा प्लॉट हा मृत्युपत्राप्रमाणे माझे मालकीचा आहे. परंतु मी व्यवसाया निमीत्त बाहेरगावी जात असल्याने व सन 2019 नंतर कोव्हीड - 19 प्रादुर्भाव असल्याने मृत्युप्रमाणपत्राप्रमाणे माझे नावाची नोंद तलाठी कार्यालय येथे करणे राहुन गेले होते. त्यामुळे 7/12 उतास्यावर माझे वडीलांचेच नाव होते. मी दि.03/03/2023 रोजी तलाठी कार्यालय नालेगांव येथे आमचे प्लॉटचा कर भरण्यासाठी व सदर प्लॉट हा माझे नावे नोंद करण्यासाठी माझे कंपनीचे मॅनेजर प्रल्हाद राय पुरोहित रा. सोसर सदन, चैतन्य नगर, प्रोफेसर कॉलनी, सावेडी अहमदनगरं यांना पाठविले होते.
त्यावेळी आमचे प्लॉटवर 7/12 उताऱ्यावर इसम नामे सुवेंद्र संतोष डाबी यांचे नावाची नोद फेरफार क्र 23505 प्रमाणे झाली असल्याचे मला समजले. त्यामुळे फेर फार क्र 23505 ची पाहणी केली असता सदर प्लॉट हा सुवेंद्र संतोष डाबी यांनी खरेदीखत दस्त क्र 97/2023 दि 04/01/2023प्रमाणे खरेदी केल्याचे दिसुन आले. त्यामुळे माझे खात्री झाली की इसम नामे सुवेंद्र संतोष डाबी या इसमाने माझे वडील सन 2019 मध्ये मयत असतांना देखील त्यांचे जागी कोणीतरी तोयता इमस उभा करुन माझे वडीलांचे नावावर असलेला प्लॉट हा विक्री केल्याची खात्री झाली. त्यांनतर सह दुय्यम निबंधक वर्ग -2, अहमदनगर -2 उत्तर कार्यालयातून नमुद दस्ताची सांक्षाकीत प्रत प्राप्त केली आहे.
माझे वडील सन 2019 मध्येच मयत असतांना व त्यांचा आधार कार्ड क्र 333691586378 असा असुन त्यावरील पत्ता हा भिलवारा राजस्थान असा आहे. व पॅन कार्ड क्र. AHMPK1257A असे असतांना देखील वडील मयत असल्याचे गोष्टीचा गैरफायदा घेवुन इसम नामे सुवेंद्र संतोष डाबी रा. सौरभ कॉलनी,सुरज कॉम्प्लेक्स, राघवेंद्रस्वामी मंदीर जवळ, अहमदनगर याने माझे वडीलांचे मृत्युनंतर तोतया इसम हा माझे वडील आहेत या प्रमाणे. त्यांचे बनावट आधार कार्ड क्र 575972293128 व बनावट पॅन कार्ड क्र MSVPK2096R या प्रमाणे तयार करुन त्यावरील पत्ता हा चुकीचा माळ गल्ली, श्रीगोंदा अहमदनगर असा चुकीचा नमुद करुन या बनावट ओळखपत्र हे माझे वडीलांचे नावाने बनवुन त्यांना सह दुय्यम निबंधक वर्ग -2, अहमदनगर येथे दुय्यम निबंधक कार्यालयात तोतया इसम म्हणुन माझे वडीलांचे जागी लिहून देणार म्हणुन उभा करुन माझे मयत वडीलांचे नावे असलेला मौजे नालेगांव, अहमदनगर येथे स.नं. 17/4, मधील प्लॉट न 01 चे क्षेत्र 1584.00 चौ.मी. चा प्लॉट इसम नामे सुवेंद्र संतोष डाबी याने बनावट
खरेदीखत दस्त क्र 97/2023 प्रमाणे लिहुन घेवुन दि. 04/01/2023 रोजी रक्कम रुपये 44,35,500/- रुपये किमंतीस विकत घेवुन नोंदविलेला आहे. त्यात भरण्यामध्ये रक्कम रुपये 22,45,500/- ही रोख स्वरुपात लिहुन देणार तोतया इसम यौना दिली असल्याचे नमुद आहे. तसेच त्या व्यतिरीक्त उर्वरीत रक्कम ही लिहुन घेणार यांनी लिहून देणार यांना त्यांचे कोटक महिंद्रा बँक लिमी शाखा नागापुर, अहमदनगर येथून आर.टी.जी. एस व चेक क्र 000043 ते 000047 प्रमाणे दिलेली आहे. त्यात लिहुन देणार व लिहुन घेणार सुवेंद्र संतोष डाबी यास व्यक्तीशा बनावट ओळख ही इसम नामे निल शरद कांबळे रा. अहमदनगर व मोहन अशोक वाटमारे रा अहमदनगर यांनी दिलेली आहे. तसेच दस्ताचे ड्राफवर पेज न 08/20 मध्ये साक्षीदार म्हणुन सही ही इसम नामे अनिरुध्द सुभाष पाटील रा नालेगांव अहमदनगर व इसम नामे अक्षय राकेश ओस्वाल रा. श्रीगोंदा अहमदनगर यांनी सही केलेली आहे.
याप्रमाणे इसम 01) नामे सुवेंद्र संतोष डाबी रा. सौरभ कॉलनी, सुरज कॉम्प्लेक्स, राघवेंद्रस्वामी मंदीर जवळ, अहमदनगर, व 02) त्यांनी माझे मयत वडील यांचे जागी उभा केलेला तोयता इसम, तसेच लिहुन देणार व लिहुन घेणार यांना व्यक्तीश ओळख देणारे साक्षीदार इसम नामे 03) निल शरद कांबळे रा कांबळे वाडा, चितळे रोड, अहमदनगर व 04) मोहन अशोक वाटमारे रा साईराम सोसायटी नगर कल्याण रोड नवनाथ मंदीर समोर, शिवाजी नगर, अहमदनगर व खरेदीखताचे ड्राफवर सही करणारे साक्षीदार 05) अनिरुध्द सुभाष पाटील रा नालेगांव अहमदनगर व 06) अक्षय राकेश ओस्वाल रा श्रीगोंदा अहमदनगर यांनी संगणमताने माझे वडीलांचे जागी इसम क्र 02 हा तोतया उभा करुन माझे वडील सन 2019 मयत असतांना देखील त्यांचे चुकीचे खोटे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड तयार करुन त्या आधारे आमचा मौजे नालेगांव, अहमदनगर येथे स.नं. 17/4 मधील प्लॉट न 01 चे क्षेत्र 1584.00 चौ.मी. हा प्लॉट हा बनावट खरेदीखत दस्त क्र 97/2023 दि. 04/01/2023 रोजी सह दुय्यम निबंधक वर्ग -2, अहमदनगर -2, उत्तर या कार्यालयात नोंदवुन परस्पर रक्कम रुपये 44,35,500/- रुपयेकिंमतीस विक्री केला आहे. म्हणुन माझी नमुद इसम यांचे विरुध्द कायदेशीर फिर्याद आहे. माझा वरील फिर्याद संगणकावर
मराठीत टंकलिखीत केला असुन ती मी वाचुन पाहीली ती माझे सांगणे प्रमाणे बरोबर आहे. पुढील तपास पोराई गजेंद्र इंगळे हे करित आहेत.
Tags :
10128
10





